संतापजनक! अभ्यास करत नाही म्हणून आत्याने चिमुकल्या भाचीची नखे पकडीने उपटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 20:44 IST2018-10-09T20:44:06+5:302018-10-09T20:44:57+5:30

Regrettably! Because of not doing the study, Chimukala picked up nails with the nickname | संतापजनक! अभ्यास करत नाही म्हणून आत्याने चिमुकल्या भाचीची नखे पकडीने उपटली

संतापजनक! अभ्यास करत नाही म्हणून आत्याने चिमुकल्या भाचीची नखे पकडीने उपटली

बंगळुरू - सात वर्षांची भाची अभ्यास करत नाही म्हणून तिच्या आत्याने पकडीने चिमुकल्या भाचीची नखेच उपटली आहेत. ही संतापजनक घटना उघडकीस आल्यावर पोलिसांनी भाचीला मारहाण करणाऱ्या आत्याला आणि तिच्या नवऱ्याला अटक केली आहे. तसेच बाल अत्याचार कायद्यांतर्गत (पॉक्सो ) त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

चिमुकलीच्या हाताला झालेली जखम पाहून तिच्या आजीने तिला रुग्णालयात दाखल केले. तिला अभ्यासासाठी पेन्सिलही हातात धरता येत नव्हती. तसेच तिला हातही हलवता येत नव्हता. घडलेल्या प्रकाराबाबत मुलीला विचारले असता अभ्यास करण्यासाठी आत्या नेहमी मुलीला मारहाण करत असल्याचे तिने सांगितले. तसेच अभ्यास करत असूनही तिने पकडीने माझे बोट दाबले आणि त्यानंतर तिने माझे नख उपटल्याचे मुलीने सांगितले. या घटनेबाबत डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पॉक्सो अन्वयेगुन्हा दाखल करून आत्याला आणि तिच्या नवऱ्याला अटक केली आहे. ते मुलीवर अत्याचार का करत होते याची पोलीस चौकशी करत आहेत. चिमुकल्या मुलीच्या आईचा काही महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला आहे. तर वडील कामानिमित्त दुसऱ्या जिल्ह्यात राहत असल्याने ही मुलगी आत्याकडे राहात होती.

Web Title: Regrettably! Because of not doing the study, Chimukala picked up nails with the nickname