पैसे दिले नाही म्हणून केला चाकूहल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 18:12 IST2019-07-26T18:09:55+5:302019-07-26T18:12:09+5:30

विरार पोलिसांनी फरार दोन्ही आरोपीच्या विरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. 

Refuse to give money; assualted try to kill him | पैसे दिले नाही म्हणून केला चाकूहल्ला

पैसे दिले नाही म्हणून केला चाकूहल्ला

ठळक मुद्दे 23 वर्षीय रिक्षाचालक तरुणाकडे दोघांनी खर्चासाठी 100 ते 150 रुपये मागितले. नाकावर फाईट मारून गंभीर व किरकोळ स्वरूपाच्या दुखापती करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.  

नालासोपारा - सोमवारी रात्रीच्या सुमारास विरार पूर्वेकडील जीवदानी पाडा येथील पान टपरीवर उभ्या असलेल्या 23 वर्षीय रिक्षाचालक तरुणाकडे दोघांनी खर्चासाठी 100 ते 150 रुपये मागितले. मात्र, त्याने देण्यास नकार दिल्याने रागाच्याभरात चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विरार पोलिसांनी फरार दोन्ही आरोपीच्या विरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. 

विरार पूर्वेकडील जीवदानी पाड्यात राहणारा रिक्षाचालक अश्रफ अब्बास खान (23) हा सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घरासमोरील टपरीवर उभा असताना सदर ठिकाणी पिटु मिश्रा आणि बिमलेश उर्फ टकल्या हे आले आणि खर्चासाठी 100 ते 150 रुपये खर्चासाठी मागितले. अश्रफ याने नकार दिल्यावर तोच राग मनात धरत चाकूने डाव्या बाजूला छातीवर, डाव्या बरगडीवर, उजव्या हाताच्या दंडावर, डाव्या पायाच्या मांडीवर, डाव्या बाजूला पाठीवर वार केले आहे. तसेच नाकावर फाईट मारून गंभीर व किरकोळ स्वरूपाच्या दुखापती करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.  

Web Title: Refuse to give money; assualted try to kill him