To reach the dream city of Mumbai, a ruthless mother sold her 2-month-old baby | स्वप्ननगरी मुंबई गाठण्यासाठी निर्दयी आईनं तिच्या २ महिन्याच्या बाळाला विकलं

स्वप्ननगरी मुंबई गाठण्यासाठी निर्दयी आईनं तिच्या २ महिन्याच्या बाळाला विकलं

ठळक मुद्देहैदराबाद येथील सुभानपूर परिसरात २२ वर्षीय  झोया खान पतीसोबत झालेल्या भांडणानंतर एकटीच राहत होती. झोयाने शेजारी राहणाऱ्या एस. के. मोहम्मद आणि तबस्सुम या दाम्पत्याला ४५ हजारांना बाळ विकण्याचं ठरवलं. 

मायानगरी मुंबईत येण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईनेच आपल्या पोटच्या गोळ्याला विकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबादमधील हबीब नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी २२ वर्षीय महिलेला २ महिन्याचा बाळाला विकण्याचा प्रयत्न करत असताना अटक केली. तक्रार दाखल झाल्यानंतर २४ तासाच पोलिसांनी कारवाई केली. २ महिन्याच्या नवजात बाळाचा ताबा मिळवला आणि महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. 


हैदराबाद येथील सुभानपूर परिसरात २२ वर्षीय  झोया खान पतीसोबत झालेल्या भांडणानंतर एकटीच राहत होती. तिला मायानगरी मुंबईत येण्याची इच्छा होती. तसेच २ महिन्याची बाळाची एकटी काळजी घेताना तिला पैशासह अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत होतं. यावेळी तिने आपल्या बाळाला विकण्याचा निश्चय केला. शेख अदनाना असं या दोन महिन्याच्या बालकाचं नाव आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली. झोयाने शेजारी राहणाऱ्या एस. के. मोहम्मद आणि तबस्सुम या दाम्पत्याला ४५ हजारांना बाळ विकण्याचं ठरवलं. 

महिलेच्या पतीला बालकाला विकण्याचा प्रयत्न होत असल्याची चुणचुण लागली होती. माहिती मिळाल्यानंतर पतीने हबीब नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी बाळाची आई तसेच बाळाला विकत घेणाऱ्या कुटुंबातील पाच जणांना अटक केली आहे. व्यवहारासाठी मध्यस्थी करणाऱ्यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बाळाला त्याच्या वडिलांकडे सोपवण्यात आलं आहे, अशी माहिती हबीब नगर पोलीस ठाण्याच्या पी. शिव चंद्रा यांनी ही माहिती दिली. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

मलेशियात असलेल्या तरुणीचा जळगावात ऑनलाईन घटस्फोट

 

सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत

Web Title: To reach the dream city of Mumbai, a ruthless mother sold her 2-month-old baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.