खतरनाक! नवरीने दुसऱ्याच दिवशी नवरदेवाला दिला फिल्मी स्टाइल दणका, केली अशी डिमांड की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 17:55 IST2022-02-25T17:54:38+5:302022-02-25T17:55:38+5:30
Madhya Pradesh : ही घटना राजनगरच्या दलपतपुरा गावाजवळ घडली. इथे एका व्यक्तीच्या माध्यमातून सतनाची राहणाऱ्या तरूणीसोबत सोनल लालचं लग्न झालं होतं.

खतरनाक! नवरीने दुसऱ्याच दिवशी नवरदेवाला दिला फिल्मी स्टाइल दणका, केली अशी डिमांड की...
मध्य प्रदेशच्या छतरपूरमध्ये सोनल कपूरचा बॉलिवूड सिनेमा 'डॉली ओ डॉली'प्रमाणे एका नवरीने एका नवरदेवाला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना राजनगरच्या दलपतपुरा गावाजवळ घडली. इथे एका व्यक्तीच्या माध्यमातून सतनाची राहणाऱ्या तरूणीसोबत सोनल लालचं लग्न झालं होतं.
लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरीची डिमांड
लग्न सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत आणि रितीरिवाजाप्रमाणे पार पडलं. पण लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाला नवरीने दणका दिला. नवरीने हाताची मेहंदी उतरण्याआधीच लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पतीकडे नवीन मोबाइल आणि सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली. इतकंच नाही तर असं केलं नाही तर माहेरी परत जाईन अशी धमकीच नवरीने नवरदेवाला दिली.
कर्ज घेऊन नवरीची मागणी केली पूर्ण
आता नुकतंच लग्न केलेली नवरी माहेरी परत जाणार या भीतीने नवरदेवाने याबाबत आपल्या वडिलांना सांगितलं. त्यांनीही मुलाचा विचार करत दीड लाख रूपये कर्ज घेतलं. त्यातून त्यांनी नवरीला नवा कोरा १६ हजार रूपयांचा मोबाइल गिफ्ट दिला. तर बाकी उरलेले पैसे दागिने खरेदी करण्यासाठी तिला दिले.
कथित भाऊच नवरीला घेऊन झाला फरार
आरोप आहे की, नवरीचा कथित भाऊ ज्याने लग्न करण्यात मदत केली होती. तो सोनल लालच्या घरी आला. काहीतरी कारण देत तो एक दिवसाआधी लग्न झालेल्या नवरीला सोबत घेऊन कॅश व दागिने घेऊन फरार झाला.
आताच लग्न झालेली नवरी परत आली नाही त्यामुळे पीडित नवरदेवाने कुटुंबियांसोबत मिळून पोलिसात तक्रार दिली. त्यांना घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. तसेच फसवणूक करून घेण्यात आलेली सगळी संपत्ती परत देण्याची मागणी केली. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. त्यानंतर योग्य ती कारवाई करतील.