शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र बर्‍हाटे हाच टोळीचा मुख्य सूत्रधार; उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 15:26 IST

खंडणी प्रकरणी पुणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर रवींद्र बर्‍हाटे व अमोल चव्हाण यांनी घेतली होती मुंबई उच्च न्यायालयात धाव..

ठळक मुद्देखंडणी, ब्लॅकमेलिंग, जीवे मारण्याची धमकी देणे अशा वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल

पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटे याचा या गुन्ह्यांशी असलेला संबंध व त्याच्या भूमिकेविषयी सरकार पक्षाने समोर आणलेले पुरावे लक्षात घेता तोच या टोळीचा मुख्य सुत्रधार आहे, असे निरीक्षक नोंदवित मुंबई उच्च न्यायालयाने रवींद्र बर्‍हाटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी हा निर्णय दिला आहे.खंडणी प्रकरणी पुणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर रवींद्र बर्‍हाटे व अमोल चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने दोघांचेही अर्ज फेटाळून लावल्यानंतर कोथरुड पोलिसांनी अमोल चव्हाण याला अटक केली आहे. मात्र, रवींद्र  बर्‍हाटे हा अजून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांना धमकावुन खंडणी वसुल केल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह देवेंद्र जैन, शैलेश जगताप यांना अटक केली होती. त्यांची आता जामिनावर सुटका झाली आहे.कोथरुड पोलीस ठाण्यातील गुन्ह्यानंतर यांच्यावर शहरातील आणखी काही पोलीस ठाण्यात खंडणी, ब्लॅकमेलिंग, जीवे मारण्याची धमकी देणे अशा वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल झाले आहेत. 

रवींद्र बर्‍हाटे यांच्या जामीन अर्जाला सरकारी वकील देशमुख यांनी विरोध केला. त्यासाठी पुरेसा पुरावा सरकार पक्षाने सादर केला आहे. न्यायालयासमोर आणलेल्या बाबी त्यांचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळण्यासाठी पुरेशा आहेत.  बर्‍हाटे यांच्या घरझडतीत ५२ जमिनीच्या पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी आढळून आल्या आहेत. तसेच यातील आरोपींचे एकमेकांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर फोन कॉल झालेले दिसून येत आहेत. त्यावरुन सर्व आरोपी हे एकमेकांशी सतत संपर्कात होते, हे सिद्ध करण्यास पुरेसे आहेत. तसेच हिंजवडी पोलीस ठाण्यात कर्नाटकी यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला, त्याचा अर्जही  बर्‍हाटे यांच्या सांगण्यावरुन टाईप केल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने  बर्‍हाटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिसHigh Courtउच्च न्यायालय