साफसफाई करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; परराज्यातून केले अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 18:59 IST2022-06-15T18:58:42+5:302022-06-15T18:59:20+5:30
Rape Case : कासिम हा पळून गेल्याने सहायक पोलीस आयुक्त विलास सानप व वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेंद्र चंदनकर व पोलीस पथकाने आरोपीचा शोध चालवला होता.

साफसफाई करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; परराज्यातून केले अटक
मीरारोड : काशीमीरा पोलिस ठाणे हद्दीत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून पसार झालेल्या पेणकरपाड्यातील सलून चालक आरोपीस ४ महिन्या नंतर उत्तरप्रदेश येथून अटक करण्यात आली आहे.
शिक्षण घेत असलेली १६ वर्षीय मुलगी एका खाजगी ठिकाणी फावल्या वेळात साफसफाईचे काम करते. २५ जानेवारी २०२२ रोजी ती मुलगी नेहमी प्रमाणे सफाई काम करत असताना तेथील केशकर्तनालय चालवणाऱ्या कासिम शौकत सलमानी (२२) ह्याने तिचा बळजबरी विनयभंग केला. या प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी विनयभंग व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला होता.
कुर्ल्यात खळबळ! विवाहितेवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी केली ४ जणांना अटक
कासिम हा पळून गेल्याने सहायक पोलीस आयुक्त विलास सानप व वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेंद्र चंदनकर व पोलीस पथकाने आरोपीचा शोध चालवला होता. प्रांतर कासिम हा आधी त्याच्या उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूर येथील सटनेरा या गावी गेला होता. नंतर तो तेथून दिल्ली येथे पळाला होता. पोलीस त्याच्या मागावर होते पण तो गुंगारा देत होता. तो पुन्हा मूळ गावी आल्याचे समजल्यानंतर पोलीस पथकाने त्याला १३ जून रोजी अटक केली. तो सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस अधिक तपास करत आहेत.