लग्नाचे आमिष दाखवून तरूणाचा बलात्कार : गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 19:34 IST2018-11-13T19:34:14+5:302018-11-13T19:34:50+5:30

लग्नाचे आमिष दाखवुन आरोपीने वेळोवेळी फिर्यादीबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

raped by showing wedding attractions : Filed a complaint | लग्नाचे आमिष दाखवून तरूणाचा बलात्कार : गुन्हा दाखल 

लग्नाचे आमिष दाखवून तरूणाचा बलात्कार : गुन्हा दाखल 

 पिंपरी : लग्नाचे आमिष दाखुवन महात्मा फुलेनगर येथील तरूणाने २३ वर्षीय तरूणीवर बलात्कार केला. या प्रकरणी भोसरीपोलिसांकडे फिर्याद दाखल झाली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर संजय कांबळे (वय २७) असे आरोपीचे नाव आहे. त्याने लग्नाचे आमिष दाखवुन आरोपीने वेळोवेळी फिर्यादीबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच शिवीगाळ मारहाणसुद्धा केली. तरूणीने या प्रकरणी फिर्याद दाखल केली असून भोसरी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: raped by showing wedding attractions : Filed a complaint