बलात्कारातून जन्मलेले बाळ मुलीने टाॅयलेटमध्ये फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 05:58 IST2021-09-05T05:58:27+5:302021-09-05T05:58:42+5:30

केरळमधील खळबळजनक घटना

The raped baby was thrown into the toilet by the girl | बलात्कारातून जन्मलेले बाळ मुलीने टाॅयलेटमध्ये फेकले

बलात्कारातून जन्मलेले बाळ मुलीने टाॅयलेटमध्ये फेकले

ठळक मुद्देया मुलीवर एका २० वर्षीय व्यक्तीने बलात्कार केला होता. दोन दिवसापूर्वी ती आपल्या आईसोबत कोचीमधील एका रुग्णालयात तपासणीसाठी गेली. रांगेत उभी असताना ती मुलगी अचानक बाथरुममध्ये गेली.

कोची : बलात्कारातून गर्भवती राहिलेल्या एका अल्पवयीन मुलीने कोची येथील एका रुग्णालयाच्या बाथरुममध्ये बाळाला मुदतपूर्व जन्म दिला आणि त्यानंतर नवजात अर्भक टॉयलेटमध्ये टाकून फ्लश करून वाहवून दिले.

या मुलीवर एका २० वर्षीय व्यक्तीने बलात्कार केला होता. दोन दिवसापूर्वी ती आपल्या आईसोबत कोचीमधील एका रुग्णालयात तपासणीसाठी गेली. रांगेत उभी असताना ती मुलगी अचानक बाथरुममध्ये गेली. तेथे तिने बाळाला मुदतपूर्व जन्म दिला. घाबरलेल्या मुलीने ही माहिती कुणालाही न देता बाळाला गुपचूप टॉयलेटमध्ये टाकून फ्लश केले, नंतर ती पुन्हा रांगेत येऊन उभी राहिली. पण तिच्यानंतर टॉयलेटमध्ये गेलेल्या एका व्यक्तीला तेथे रक्त व मांस आढळून आले. त्याने पोलिसांना माहिती दिली.  पोलिसांनी तपास केल्यानंतर सारा प्रकार उजेडात आला.
पोलिसांनी सांगितले की, मुलगी अल्पवयीन असून तिने बलात्कार आणि गर्भधारणा याबाबत कुणालाच काही सांगितले नव्हते. ती रुग्णालयात आली तेव्हा ती सहा महिन्याची गर्भवती होती. तिच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या वायनाड येथील आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करून कोची येथे आणण्यात आले आहे.

Web Title: The raped baby was thrown into the toilet by the girl