पिंपरीत जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 17:23 IST2018-12-12T17:12:04+5:302018-12-12T17:23:19+5:30

अश्लील चित्रिकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवुन आरोपीने वारंवार महिलेवर अत्याचार केला.

Rape women from threatens to kill him at pimpri | पिंपरीत जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

पिंपरीत जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

ठळक मुद्देसोशल मीडियावर ते व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी पीडितेला ब्लॅकमेलतिच्याकडून घेतलेल्या पैशाने सहा ते सात लाखांच्या महागड्या वस्तु खरेदीयाप्रकरणी आरोपीविरोधात हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल

पिंपरी :  महिलेला मारहाण, शिवीगाळ करत कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. अश्लील चित्रिकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवुन आरोपीने वारंवार महिलेवर अत्याचार केला. या प्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. साईनाथ शेट्टी (वय ४४,रा.थेरगाव, मूळ - मसूर टॉवर मरोळ, अंधेरी, मुंबई ) असे आरोपीचे नाव आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साईनाथ शेट्टी हा थेरगाव येथील राहणारा आहे.पीडित महिला चिंचवड येथील रहिवासी आहे. सप्टेंबर २०१७ पासून आरोपी पीडित महिलेवर सातत्याने अत्याचार करत आहे. हिंजवडी, बांद्रा, पुणे, लोणावळा आदी ठिकाणच्या हॉटेलांमध्ये वेळोवेळी नेऊन आरोपीने पीडितेशी जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. पीडित महिला गरोदर असतानाही त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केले. तिचे अश्लील चित्रीकरण करून सोशल मीडियावर ते व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी पीडितेला ब्लॅकमेल करत होता. तिच्याकडून घेतलेल्या पैशाने सहा ते सात लाखांच्या महागड्या वस्तु आरोपीने खरेदी केल्या. तिचा शारीरिक, मानसिक छळ केला. याप्रकरणी आरोपीविरोधात हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Rape women from threatens to kill him at pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.