सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 14:12 IST2019-08-22T14:09:47+5:302019-08-22T14:12:15+5:30
आरोपीने सोशल मीडियावर फोटो प्रसारित करण्याची तसेच महिलेच्या पतीला दाखवण्याची भीती दाखवली.

सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
पिंपरी : महिलेच्या सोशल मीडियावर असलेले फोटो स्वत:कडे सेव्ह करून ते इतर सोशल मीडियावर टाकण्याची तसेच पतीला दाखवण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार केला. ही घटना २०१३ ते २३ जून २०१९ या कालावधीत चिखली येथे घडली.
याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विपुल सुरेश कासार (वय ३९) याला पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने त्यांच्या व्हॉट्स अॅप अकाउंटवर ठेवलेले फोटो आरोपी विपुल याने स्वत:कडेच जतन करून ठेवले. हे जतन केलेले फोटो अन्य सोशल मीडियावर प्रसारित करण्याची तसेच महिलेच्या पतीला दाखवण्याची भीती दाखवली. आरोपी विपुल याने महिलेच्या मुलांना मारून टाकण्याची धमकी देत त्यांचे पती घरात नसताना जबरदस्तीने घरात घुसून महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत.