म्हैस खरेदी करायला गेलेल्या महिलेवर बलात्कार; थंडीच्या बहाण्याने खोलीत बोलावले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 22:03 IST2021-11-22T22:03:19+5:302021-11-22T22:03:56+5:30

Rape Case : झज्जर जिल्ह्यातील एका गावातील एक महिला हिसार येथे म्हशी खरेदी करण्यासाठी गावी गेली होती. दोन व्यापाऱ्यांनी तिला हरिता गावात नेले. एका आरोपीने महिलेला थंडीच्या बहाण्याने खोलीत बोलावले.

Rape of a woman who went to buy buffalo; Called in the room under the pretext of cold and ... | म्हैस खरेदी करायला गेलेल्या महिलेवर बलात्कार; थंडीच्या बहाण्याने खोलीत बोलावले अन्...

म्हैस खरेदी करायला गेलेल्या महिलेवर बलात्कार; थंडीच्या बहाण्याने खोलीत बोलावले अन्...

हरियाणात हिसारच्या आझाद नगर पोलीस स्टेशन परिसरात म्हैस खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेवर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी आझाद नगर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

आझाद नगर, हिसारचे पोलीस स्टेशन प्रभारी गुरमीत सिंग यांनी सांगितले की, या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.
 

महिला दोन लोकांसोबत म्हैस घेण्यासाठी गेली

झज्जर जिल्ह्यातील एका गावातील एक महिला हिसार येथे म्हशी खरेदी करण्यासाठी गावी गेली होती. दोन व्यापाऱ्यांनी तिला हरिता गावात नेले. एका आरोपीने महिलेला थंडीच्या बहाण्याने खोलीत बोलावले.

महिलेने आरोप केला आहे की, एका व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला तर दुसरा खोलीबाहेर उभा होता. म्हशी आणण्याच्या नावावर  ५ हजार रुपये घेतल्याचा आरोप महिलेने केला आहे.

महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

पोलिसांनी हरिता येथील रहिवासी लालू आणि सुरेंद्र यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आझाद नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी गुरमीत सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.

Web Title: Rape of a woman who went to buy buffalo; Called in the room under the pretext of cold and ...