लग्नाचे अमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म; गर्भवती राहताच गुन्हा

By काशिनाथ वाघमारे | Updated: May 30, 2023 20:26 IST2023-05-30T20:26:01+5:302023-05-30T20:26:50+5:30

याबाबत बार्शी पोलिसांनी अशोक घुले (रा. भूम) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

Rape of minor girl by luring marriage; Offense after being pregnant | लग्नाचे अमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म; गर्भवती राहताच गुन्हा

लग्नाचे अमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म; गर्भवती राहताच गुन्हा

सोलापूर : अल्पवयीन मुलिला लग्नाचे अमीष दाखवून पाच महिन्यापूर्वी शरिर संबध ठेवले. डॉकटरकडे तपासणीत ती गर्भवती असल्याचे स्पष्ठ होताच पीडित मुलीने बार्शी शहर पोलिसात धाव घेतली.

याबाबत बार्शी पोलिसांनी अशोक घुले (रा. भूम) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार पीडित मुलगी ही बार्शी तालुक्यात आणि त्यानंतर बीड येथे शिक्षणासाठी राहिली होती. यातील आरोपीस व त्याच्या कुटुंबियास ती लहानपणापासून ओळखते. त्याने २०२१ पासून तू मला खूप आवडतेस म्हणत वारवांर प्रपोज करत होता. तिने त्याला नकार देत होती. परंतु त्यानंतर तो सतत विचारत होता. त्यास होकार दिला. तेंव्हापासून प्रेम प्रकरण सुरू होते. तिचे घर भूम तालुक्यात एका गावात असून ७ जाने २०२३ रोजी त्याने घरी कोणी नसल्याची संधी साधली. तूझ्याशी लग्न करतो म्हणत शरिर संबंध ठेवले. त्यानंतर बोलणे भेटणे सुरू होते. २९ मे रोजी तिच्या पोटात दुखू लागताच आईने व मामांनी तिला बार्शीत एका दवाखाण्यात घेऊन गेले.
सोनोग्राफी करताच तपासणीत ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या अल्पवयीन मुलीने बार्शी शहर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. पुढील तपासासाठी हे प्रकरण भूम पोलिसाकडे वर्ग करण्यात आले आहे.

Web Title: Rape of minor girl by luring marriage; Offense after being pregnant