तुझ्या आईला जामीन मिळवून देतो, अशी बतावणी करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 20:01 IST2021-11-29T20:00:32+5:302021-11-29T20:01:27+5:30
Rape Case : याप्रकरणी रविवारी संध्याकाळी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी प्रदीपला अटक केली.

तुझ्या आईला जामीन मिळवून देतो, अशी बतावणी करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
डोंबिवली: अंमली पदार्थ बाळगल्याच्या गुन्हयातील आरोपी असलेल्या महिलेच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीसांनी प्रदीप देहरा या 28 वर्षीय तरुणाला बेडया ठोकल्या असून त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पिडीत 14 वर्षीय मुलीची आई अंमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत होती. दरम्यान प्रदीपने ओळखीचा फायदा उठवित मी तुझ्या आईला जामीन मिळवून देतो, असे पीडित मुलीला सांगितले. आपल्या आईला जामीन मिळेल या आशेने तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. जामीन मिळवून देण्याची बतावणी करीत प्रदीप त्या मुलीला 30 ऑक्टोबरच्या रात्री कल्याण पूर्वेतील त्याच्या घरी पूजा असल्याचे कारण सांगून घरी घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी रविवारी संध्याकाळी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी प्रदीपला अटक केली.