शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

खळबळजनक! पोलीस बंदोबस्त असूनही कॉलेज कॅम्पसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार 

By पूनम अपराज | Published: October 13, 2020 7:13 PM

Rape in Uttar Pradesh : पीसीएसची प्राथमिक परीक्षा २०२० चालू असताना विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये रविवारी १७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

ठळक मुद्देदहावीच्या विद्यार्थिनीने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या एका गटाने तिला जबरदस्तीने कॅम्पसमधील होस्टेलच्या रूममध्ये खेचत नेले होते.

उत्तर प्रदेश येथे हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे संपूर्ण देशात पडसाद उमटत असताना पुन्हा झाशीमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत दहावीच्या विद्यार्थिनीवर कॉलेज कॅम्पसमध्ये बलात्कार करण्यात आला. घटना घडली त्यावेळी कॉलेजमध्ये पोलीस बंदोबस्तात पीसीएसची ( प्रांतीय नागरी सेवा) परीक्षा सुरू होती. पीसीएसची प्राथमिक परीक्षा २०२० चालू असताना विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये रविवारी १७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.उत्तर प्रदेशमधील झांसी महाविद्यालयातपोलिस उपस्थिती असूनही, पीसीएसची परीक्षा चालू असताना विद्यार्थ्याने तरुणीला लुटले आणि चित्रीकरण देखील केले, अशी माहिती हिंदुस्तान टाईम्सने दिली आहे. दहावीच्या विद्यार्थिनीने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या एका गटाने तिला जबरदस्तीने कॅम्पसमधील होस्टेलच्या रूममध्ये खेचत नेले होते. तिने पोलिसांना सांगितले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तिच्याकडून दोन हजार रुपये लुटले आणि त्यातील एकाने तिचा लैंगिक छळ केला तर इतरांनी त्याचे चित्रीकरण केले.या घटनेबद्दल कोणाशीही काही बोलल्यास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तिला इंटरनेटवरून व्हिडिओ लीक करण्याची धमकीही दिली, असा आरोप पीडित मुलीने केला आहे. दरम्यान, कॅम्पसमध्ये अपीडित मुलीच्या उपस्थिती पोलिसांकडून तपासणी केली गेली. गेटसमोर असलेल्या एका मित्राला भेटत असताना तिला विद्यार्थ्याने जबरदस्तीने कॅम्पसमध्ये नेले होते, असे पोलिसांना सांगितले. तिने पोलिसांना सांगितले की, गेटवर सुरक्षारक्षक नव्हता. या घटनेसंदर्भात आठ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती झाशी एसएसपी दिनेश कुमार पी यांनी दिली. पुढील तपास सुरू असल्याचे एसएसपीने सांगितले.“काही पोलिस कर्मचार्‍यांनी मुलीचे ओरडणे ऐकून तिला सिप्री बाजार पोलिस ठाण्यात नेले आणि तेथे तिने पोलिसांना हकीकत सांगितली. तिने एका आरोपीची भरत म्हणून ओळख पटवली असल्याची माहिती एसएसपीने दिली आहे. पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३७६डी,३९५, ३८६, ३२३,१२० बी (गुन्हेगारी कट रच) आणि आयटी कायद्याच्या कलम ६६ड आणि पॉक्सो कलम ३ आणि ४  अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे. या गुन्ह्यानुसार रोहित सैनी, भारत कुशवाह, शैलेंद्र नाथ पाठक, मयंक शिवहरे, विपिन तिवारी, मोनू पर्या, धर्मेंद्र सेन आणि संजय कुशवाह हे अटक केलेल्यांची आरोपींची नावे आहेत. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे द्वितीय वर्षाचे विद्यार्थी होते. या घटनेत सामील झालेल्या इतर विद्यार्थ्यांची ओळख प्रस्थापित करण्यासाठी संस्था पोलिसांना सहकार्य करीत असल्याचे प्राचार्य यांनी सांगितले.  

टॅग्स :Rapeबलात्कारPOCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशArrestअटकcollegeमहाविद्यालय