चिखली येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार; बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 12:48 IST2018-12-04T12:48:12+5:302018-12-04T12:48:21+5:30

चिखली येथील एका सोळा वर्ष वयाच्या मुलीवर बलात्कार झाल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला.

rape on Minor girl in Chikhli | चिखली येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार; बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा 

चिखली येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार; बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा 

ठळक मुद्देमुलीच्या पालकानी चिखली पोलिसांकडे गुन्हा दाखल

पिंपरी : चिखली येथील एका सोळा वर्ष वयाच्या मुलीवर बलात्कार झाल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. आरोपीचे नाव मयूर असे असून त्याच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मुलीच्या पालकानी चिखली पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, थरमॅक्स चौकातील उद्यानात आरोपीची मुलीशी ओळख झाली होती. आरोपीने मुलीला भोसरी येथे भेटण्यास बोलावले. त्यांच्या ओळखीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. आरोपीने फूस लावून मुलीला नेले. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. वैद्यकीय तपासणीत ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे बलात्काराचा हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चिखली पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: rape on Minor girl in Chikhli