शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

पती व मुलाला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार; नऱ्हे येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 1:35 PM

आरोपी व फिर्यादी महिलेचा पती हे मित्र आहेत. त्यामुळे आरोपीचे महिलेच्या घरी येणे जाणे होते.

ठळक मुद्देमहिलेच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध निर्माण केल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक

पुणे : पती व मुलींना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने तीस वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याने प्रबोधन सुनील गोरे (वय:२६, ज्ञानेश्वर नगर, कोंढवा खुर्द, पुणे) यांस सिंहगड रस्ता पोलिसांनीअटक केली आहे.फिर्यादी महिला पती व दोन मुलींसह कोंढवा खुर्द येथे राहत असून आरोपी व महिलेचा पती हे मित्र आहेत.त्यामुळे आरोपीचे महिलेच्या घरी येणे जाणे असल्याने महिलेची आरोपीशी ओळख होती. ६ मे रोजी सदर फिर्यादी महिलेच्या पायाला लागल्याने नऱ्हे येथील नवले हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आली असता आरोपी नवले हॉस्पिटलच्या बाहेर थांबलेला दिसला. त्यावेळी महिलेने त्यास ओळख दाखविली असता त्याने मला तू खूप आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. त्यावेळेस महिलेने माझे लग्न झाले असून तुझ्यासोबत लग्न करणे शक्य नसल्याचे सांगताच आरोपीने तु माझ्या सोबत ये नाहीतर तुझ्या पतीला व मुलींना ठार मारून टाकेन असे सांगत सदर महिलेस गाडीवर बसवून नऱ्हे येथील लॉजवर घेऊन गेला. त्यावेळी आरोपीने महिलेबरोबर शारीरिक संबंध प्रस्थपित केले. तसेच तू याबद्दल घरी कोणास सांगितले तर बघ अशी धमकीही त्याने दिली. अशाप्रकारे आरोपीने महिलेस वेळोवेळी एकटे गाठून जबरदस्तीने शारीरिक संबंध निर्माण केले. मात्र महिलेने ही गोष्ट आपल्या पतीला सांगितली. त्यानंतर पतीने पत्नीस धीर देऊन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. वेळोवेळी जबरदस्तीने महिलेच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध निर्माण केल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद महांगडे पुढील तपास करीत आहेत.  

टॅग्स :DhayariधायरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकRapeबलात्कारWomenमहिला