अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 12:13 IST2018-12-04T12:12:19+5:302018-12-04T12:13:55+5:30

पीडित तरुणीचे नकळत अश्लिल फोटो व व्हिडिओ काढले सदरचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

rape on girl by threatening to viral sexual video clips publish on social media | अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार 

अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार 

ठळक मुद्देआरोपी दाम्पत्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : तरुणीचे नकळत अश्लिल फोटो,व्हिडिओ काढत ते हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी तिच्याकडून लाखो रुपये उकळत तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच या घटनेत पिंपळे सौदागर येथील सदनिका बक्षीस पत्र म्हणून लिहून घेतली. याप्रकरणी आरोपी दाम्पत्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तरुष ऊर्फ शीबू सिद्दीकी आणि रक्षी शीबी सिद्दीकी (रा. गोविंदपूर कॉलनी, अलाहाबाद, उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत याबाबत २९ वर्षीय पीडित तरूणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा वर्षांपूर्वी सिद्दीकी दाम्पत्याने पीडित तरुणीचे नकळत अश्लिल फोटो व व्हिडिओ काढले सदरचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तिच्याकडून वेळोवेळी लाखो रुपये घेतले. तसेच पिंपळे सौदागर येथील अर्धा फ्लॅट बक्षिस पत्राद्वारे लिहून घेतला. याबाबत पोलिसात तक्रार देऊ नये म्हणून पीडित तरूणी व तिच्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत. 

Web Title: rape on girl by threatening to viral sexual video clips publish on social media