नवघरमध्ये हवालदाराविरोधात महिला पोलिसाकडून बलात्काराची तक्रार; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 22:21 IST2021-05-22T22:18:51+5:302021-05-22T22:21:58+5:30
Crime news in mira bhayandar: हवालदार व पीडिता महिला पोलीस शिपाई हे दोघेही विवाहित आहेत.

नवघरमध्ये हवालदाराविरोधात महिला पोलिसाकडून बलात्काराची तक्रार; गुन्हा दाखल
मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्यातील हवालदार प्रेमसागर वाघ ( ५१ ) विरोधात महिला पोलीस शिपाईच्या फिर्यादी नंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हवालदार वाघ व पीडिता महिला पोलीस शिपाई हे दोघेही विवाहित आहेत. दोघेही नवघर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. वाघ याच्या छळाला कंटाळून पीडितेने स्वतःची अन्यत्र बदली करून घेतली होती.
गैरफायदा घेत २०१९ पासून वाघ ह्याने वारंवार बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने दिल्या नंतर पोलीस निरीक्षक अमर मराठे यांनी फिर्याद घेत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास नया नगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी पाटे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे . आरोपी वाघ हे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.