शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
4
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
5
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
7
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
8
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
9
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
10
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
11
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
12
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
13
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
14
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
15
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
16
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
17
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
18
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
19
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
20
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर

मूकबधिर तरुणीवरील बलात्कार प्रकरण; त्या" आरोपीला अखेर पोलिसांनी केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 7:57 PM

Rape case of deaf and dumb girl : या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  पोलिसांची 5 तपास पथके आरोपीच्या शोधात होती.अखेर हा आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे.

ठळक मुद्दे या  आरोपीला कल्याण पोलिसांनी गुजरातहून अटक केली आहे. अश्विन राठवा असे या नराधमाचे नाव असून कल्याण न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

कल्याण - कल्याण पश्चिमेकडील निर्मनुष्य असलेल्या रेल्वेच्या क्वार्टरमध्ये एका मूकबधिर तरुणीवर एका नराधमाने  बलात्कार करुन तिच्याजवळील मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना घडली होती.  या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  पोलिसांची 5 तपास पथके आरोपीच्या शोधात होती.अखेर हा आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे.     

या  आरोपीला कल्याण पोलिसांनी गुजरातहून अटक केली आहे. अश्विन राठवा असे या नराधमाचे नाव असून कल्याण न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडित तरुणी कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरात राहते. ती एका कुरिअर कंपनीच्या कार्यालयात काम करते. 2 जुलै रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास ती घरातून निघाली. तिच्या भावाने कल्याण पूर्व भागातील स्टेशन परिसरात तिला सोडले. त्यानंतर ती रस्त्याने पूर्व भागातून पश्चिमेला गेली. कल्याण पश्चिमेतील रेल्वे कॉलनीत पोहचली असता एका निजर्नस्थळी आरोपी तिचा पाठलाग करत होता. साडेपाच वाजताच्या सुमारास आरोपीने तिला गाठले आणि तिच्यावर बलात्कार केला. तिचा मोबाईल हिसकावून तो पसार झाला. ही तरुणी कशीबशी सुभाष चौकात पोहचली. ज्या ठिकाणी कामावर जाण्यासाठी तिला बस पकडायची होती, तिथे एका महिलेने तिला पाहिले. तिच्या सोबत काय घडले असावे, याची कल्पना तिला लगेच आली. तिने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने या तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले.     

कल्याण स्थानकात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात आरोपी कैद झाला होता. हा आरोपी ठाणे सीसीटीव्हीतही दिसून आला. कल्याणचे महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस आणि गुन्हे शाखा आरोपीचा शोध घेत होते. अखेर नऊ दिवसांनी आरोपीचा सुगावा लागला.       

महात्मा फुले पोलिसांनी आरोपीच्या एका मित्राला ताब्यात घेऊन त्याच्याकडून आरोपी कोण आहे, तो कुठे आहे याची माहिती घेतली. पोलिस अधिकारी दीपक सरोदे, पोलिस कर्मचारी सचिन भालेराव, सोमनाथ ठिकेकर, रविंद्र हासे यांचे तपास पथक गुजरातमधील अहमदाबाद येथे पोहचले. नराधम अश्विन राठवा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तरुणीचा मोबाईलही देखील हस्तगत केला आहे. आज कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास महिला पोलिस अधिकारी मंजूषा शेलार करीत आहेत.

टॅग्स :Arrestअटकkalyanकल्याणPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMobileमोबाइलcctvसीसीटीव्ही