नरेंद्र दाभोलकर खटल्यातील आरोपींच्या दोन वकीलासह ७ जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 19:46 IST2021-07-26T19:32:10+5:302021-07-26T19:46:57+5:30
Rape Case against Advocates : वकील महिलेची तक्रार, मरीन ड्राईव्ह पोलिसांकड़ून तपास सुरु

नरेंद्र दाभोलकर खटल्यातील आरोपींच्या दोन वकीलासह ७ जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
मुंबई : वकील महिलेच्या तक्रारीवरून नरेंद्र दाभोलकर खटल्यातील आरोपींच्या दोन वकीलासह ७ जणांविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात बलात्कार, खंडणी, मारहाण तसेच चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत.
३५ वर्षीय महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, यातील एका आरोपीने त्यांच्यावर बलात्कार केला. त्याचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ५० लाखांची खंडणी मागितली. तर अन्य आरोपीने त्यांचे १० हजार रुपये चोरले. तर काहीनी त्यांना मारहाण केल्याचे नमूद केले आहे.
त्यानुसार, शनिवारी त्यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला आहे. यातील दोन वकील नरेंद्र दाभोळकर खटल्यातील आरोपींचे वकील असून उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालयात प्रँक्टीस करतात. तर अन्य पाच जण त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी आहे. यात दोन महिलांचाही समावेश आहे.