गुंगीचे औषध देऊन गतिमंद मुलीवर बलात्कार; पोटदुखीमुळे गुन्हा उघड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 17:12 IST2019-08-19T17:08:46+5:302019-08-19T17:12:02+5:30

पीडित मुलीच्या शेजारी राहणाऱ्या २२ आणि २५ वर्षीय तरुणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 

Rape came into light when teen found pregnent | गुंगीचे औषध देऊन गतिमंद मुलीवर बलात्कार; पोटदुखीमुळे गुन्हा उघड 

गुंगीचे औषध देऊन गतिमंद मुलीवर बलात्कार; पोटदुखीमुळे गुन्हा उघड 

ठळक मुद्दे कुरार पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल आरोपी दोन तरुणांना अटक केली आहे.  गतिमंद मुलीशी जवळीक साधत शेजारी राहणारे दोन तरुण तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होते.

मुंबई - १५ वर्षीय गतिमंद मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोघांना कुरार पोलिसांनी रविवारी अटक केली. गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. कुरार पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये आणि भा. दं.वि. कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करून पीडित मुलीच्या शेजारी राहणाऱ्या २२ आणि २५ वर्षीय तरुणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 

गतिमंद मुलीशी जवळीक साधत शेजारी राहणारे दोन तरुण तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होते. गतिमंद असल्याने तिला काही समजत नव्हते. शीतपेय किंवा इतर माध्यमातून हे दोघे त्या मुलीला गुंगीचे औषध देत. या मुलीच्या पोटात दुखू लागल्याचं तिने आईला सांगितले. त्यावेळी तिला डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर ती गरोदर असल्याचं उघड झालं. ही मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली. याबाबत डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना पीडित तरुणीने याबाबत दोन तरुणांची नावं सांगितली. त्याप्रमाणे कुरार पोलिसांनी बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल आरोपी दोन तरुणांना अटक केली आहे.  

Web Title: Rape came into light when teen found pregnent