शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

योगेश्वरी देवी संस्थानकडे मागितली ५० लाखांची खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 9:44 AM

Crime News: अंबेजोगाई येथील श्री योगेश्वरी देवी मंदिर संस्थानलाही ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अन्य एका कथित गुंडाने धमकीचे पत्र पाठविले आहे.

अंबेजोगाई (जि.बीड) : ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी कथित ड्रग्ज माफियाने परळी येथील वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणाला २४ तासही उलटत नाहीत, तोच अंबेजोगाई येथील श्री योगेश्वरी देवी मंदिर संस्थानलाही ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अन्य एका कथित गुंडाने धमकीचे पत्र पाठविले आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, भाविकांतून संताप व्यक्त होत आहे. या धमकीपत्रावर प्रभाकर नामदेव पुंड (रा.पिंपळगाव नि. ता.जि.नांदेड) व एक मोबाइल क्रमांक नमूद आहे. यानंतर, मंदिर समिती सचिव ॲड.शरद लोमटे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.   

परळी प्रकरणात दोघे ताब्यात परळी (जि.बीड) : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक येथील वैद्यनाथ मंदिराला पत्राद्वारे  धमकी दिल्याप्रकरणी परळी  शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. पत्र ज्या नावाने आले, त्या व्यंकट गुरुपद मठपती (स्वामी) व ज्या पत्त्यावरून आले, त्या रतनसिंग रामसिंग दख्खने (रा.काळेश्वरनगर, विष्णुपुरी, नांदेड) यांची कसून चौकशी सुरू आहे.   या दोघांनीही अशा प्रकारचे पत्र आपण पाठविले नाही. खोडसाळपणातून आमच्या नावे पत्र पाठविली असावीत, असा दावा त्यांनी केला आहे.    

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी