उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील भोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खूंटा खेडा गावातील 'सेंट फ्रान्सिस' शाळेचे मुख्याध्यापक जोसेफ यांच्यावर ८ ते १० वर्षांच्या लहान मुलींशी गैरवर्तन केल्याचे गंभीर आरोप झाले आहेत. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
समाजात मुलांना योग्य दिशा देण्यासाठी शाळा-महाविद्यालयांची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. पालक आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल मोठी स्वप्नं पाहतात आणि शाळेला 'विद्येचे मंदिर' मानलं जातं. मात्र जेव्हा याच ठिकाणी अशा प्रकारचं गैरवर्तन समोर येतं, तेव्हा तो अत्यंत चिंतेचा विषय ठरतो. असाच एक धक्कादायक प्रकार रामपूरमध्ये समोर आला आहे.
खूंटा खेडा येथील सेंट फ्रान्सिस शाळेचे मुख्याध्यापक जोसेफ यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पालकांच्या म्हणण्यानुसार, मुख्याध्यापकाकडून ८ ते १० वर्षांच्या लहान मुलींसोबत अश्लील वर्तन आणि गैरवर्तन केलं जात होतं. हे आरोप समोर आल्यानंतर शाळेतील वातावरण तणावपूर्ण झालं. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
मुलांचे पालक आणि इतर नागरिक शाळा परिसरात जमा झाले आणि त्यांनी मुख्याध्यापकांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. याच दरम्यान गर्दीतील काही लोक संतप्त झाले आणि त्यांनी मुख्याध्यापक जोसेफ यांच्या कानशिलात लगावत त्यांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पालकांच्या वतीने भोट पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मुख्याध्यापकाला ताब्यात घेतलं आहे.
Web Summary : Uttar Pradesh school principal Joseph arrested for sexually abusing young girls. Angered parents stormed the school and physically assaulted the principal. Police are investigating the case.
Web Summary : उत्तर प्रदेश के एक स्कूल के प्रिंसिपल जोसेफ को छात्राओं के साथ छेड़छाड़ के आरोप में गिरफ्तार किया गया। गुस्साए अभिभावकों ने स्कूल में घुसकर प्रिंसिपल की पिटाई की। पुलिस मामले की जांच कर रही है।