शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

क्रूरतेची हद्द! कुटुंब ओरडत राहिलं अन् आरोपी युवकाला ट्रॅक्टरखाली चिरडत राहिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 15:26 IST

हल्ल्यावेळी गोळीबारीचा आवाजही गावकऱ्यांनी ऐकला. मारामारीत निरपत नावाचा युवक जमिनीवर पडला

भरतपूर – राजस्थानच्या भरतपूर भागात जमिनीच्या वादातून रक्तरंजित घटना घडली आहे. एका गटाने दुसऱ्या गटातील युवकाची ट्रॅक्टरनं चिरडून हत्या केली आहे. आरोपी ट्रॅक्टर चालकाने जमिनीवर पडलेल्या युवकाच्या अंगावरून तब्बल ८ वेळा चिरडले. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या प्रकाराने गावात तणावाची स्थिती निर्माण झाली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले.

पोलिसांनी मृत युवक अतर सिंहचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी हॉस्पिटलला पाठवला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अड्डा गावात बहादूर गुर्जर आणि अतर सिंह गुर्जर यांच्यात मागील अनेक काळापासून जमिनीचा वाद सुरू आहे. या वादात बुधवारी सकाळी ८ वाजता दोन्ही गट समोरासमोर आले. दोघांनी एकमेकांवर जीवघेणा हल्ला सुरू करत एकमेकांवर दगडफेक केली. त्यात दोन्ही गटाच्या महिलाही सहभागी होत्या.

हल्ल्यावेळी गोळीबारीचा आवाजही गावकऱ्यांनी ऐकला. मारामारीत निरपत नावाचा युवक जमिनीवर पडला. तेव्हा बहादूर गटाच्या युवकाने ट्रॅक्टर निरपतच्या अंगावर घातला. ट्रॅक्टर चालकाला थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु तो थांबला नाही. त्यानं जमिनीवर पडलेल्या निरपतच्या अंगावर ८ वेळा ट्रॅक्टरचे चाक चढवले. त्यात घटनास्थळीच निरपतचा मृत्यू झाला. जमिनीच्या वादातून ५ दिवसांपूर्वीच २१ ऑक्टोबरला बहादूर आणि अतर सिंह गुर्जर यांच्यात वाद झाला होता. ज्यात बहादूर आणि त्याचा छोटा भाऊ गंभीररित्या जखमी झाले होते.

या घटनेनंतर बहादूरचा मुलगा दिनेश आणि दुसऱ्य गटातील अतर सिंह आणि त्याचा मुलगा निरपत, विनोद, दामोदर आणि नातेवाईक यांच्याविरोधात पोलीस तक्रार देण्यात आली होती. सध्या पोलीस घटनास्थळी पोहचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. ट्रॅक्टरचालक फरार झाला असून मृत युवकाचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी