राजस्थान हादरलं! प्रसिद्ध कथावाचकचा संशयास्पद मृत्यू; 'त्या' कंपाउंडरने दिलेल्या सुईने संशय बळावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 12:54 IST2026-01-29T12:47:25+5:302026-01-29T12:54:42+5:30

राजस्थानातील प्रसिद्ध कथावाचक साध्वी प्रेम बाईसा यांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे.

Rajasthan Storyteller Sadhvi Prem Baaisa suspicious death in Rajasthan 6 month old video goes viral | राजस्थान हादरलं! प्रसिद्ध कथावाचकचा संशयास्पद मृत्यू; 'त्या' कंपाउंडरने दिलेल्या सुईने संशय बळावला

राजस्थान हादरलं! प्रसिद्ध कथावाचकचा संशयास्पद मृत्यू; 'त्या' कंपाउंडरने दिलेल्या सुईने संशय बळावला

Rajasthan Sadhvi Prem Baaisa:राजस्थानमधील लोकप्रिय कथावाचक साध्वी प्रेम बाईसा यांचा २८ जानेवारीच्या रात्री जोधपूरमधील एका रुग्णालयात संशयास्पद मृत्यू झाला. हा मृत्यू नैसर्गिक नसून त्यामागे मोठे षडयंत्र असल्याचा खळबळजनक दावा नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल यांनी केला आहे. साध्वींच्या मृत्यूनंतर त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर झालेल्या एका पोस्टने आणि जुन्या वादाने या प्रकरणातील गूढ अधिक वाढवले आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, साध्वी प्रेम बाईसा यांना गेल्या काही दिवसांपासून ताप होता. उपचारासाठी एका कंपाउंडरला त्यांच्या आश्रमात बोलावण्यात आले होते. या कंपाउंडरने त्यांना एक इंजेक्शन दिले, त्यानंतर त्यांची प्रकृती वेगाने बिघडली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र, इंजेक्शन दिल्यानंतर नक्की काय झाले? तो कंपाउंडर कोण होता? या प्रश्नांनी संशयाची सुई फिरवली आहे.

मृत्यूनंतरची 'ती' इन्स्टाग्राम पोस्ट अन् खळबळ

साध्वींच्या निधनानंतर साधारण ४ तासांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टमध्ये अग्निपरीक्षेचा उल्लेख करण्यात आला आहे. साध्वींचा मृत्यू झालेला असताना ही पोस्ट कोणी शेअर केली? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. ही पोस्ट म्हणजे आत्महत्येचे संकेत आहेत की त्यांना काही सुचवायचे होते, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

खासदार हनुमान बेनीवाल यांची आक्रमक भूमिका

खासदार हनुमान बेनीवाल यांनी मुख्यमंत्री आणि राजस्थानच्या पोलीस महासंचालकांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, "जोधपूरच्या रुग्णालयात साध्वी प्रेम बाईसा यांचा संशयास्पद मृत्यू होणे अत्यंत दुःखद आहे. ही घटना सामान्य वाटत नाही, याची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे."

६ महिने जुन्या 'त्या' व्हिडिओचे कनेक्शन काय?

जुलै २०२५ मध्ये साध्वी प्रेम बाईसा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्या एका पुरुषाला मिठी मारताना दिसत होत्या. यावरून त्यांच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले गेले. यावर साध्वींनी स्पष्टीकरण दिले होते की, "तो व्हिडिओ जुना असून मी माझ्या वडिलांना मिठी मारत होते. मला बदनाम करण्यासाठी आणि २० लाख रुपयांची खंडणी मागण्यासाठी हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने पसरवला गेला."

ब्लॅकमेलिंगचे षडयंत्र

पोलीस तपासात समोर आले होते की, साध्वींचा माजी कर्मचारी जोगेंद्र, ड्रायव्हर रमेश आणि अन्य काही जणांनी मिळून हा व्हिडिओ व्हायरल केला होता. जोगेंद्रने वैयक्तिक रागातून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. या टोळीने २० लाखांची मागणी केली होती, जी न दिल्याने त्यांनी व्हिडिओ व्हायरल केला होता.

तपास आणि पोस्टमार्टम

साध्वींच्या पार्थिवाचे २९ जानेवारी रोजी पोस्टमार्टम करण्यात येणार असून, त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. प्राथमिक चौकशीत तापाचे कारण सांगितले जात असले तरी, खासदार बेनीवाल यांचा दावा आणि सोशल मीडियावरील गूढ पोस्टमुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.
 

Web Title : राजस्थान: कथावाचक साध्वी प्रेम बाई की संदिग्ध मौत, विवादों में घिरी।

Web Summary : राजस्थान में साध्वी प्रेम बाई की संदिग्ध मौत से सवाल उठे। कंपाउंडर का इंजेक्शन और मौत के बाद इंस्टाग्राम पोस्ट से साजिश की आशंका। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Rajasthan: Popular कथावाचक Sadhvi Prem Bai's suspicious death sparks controversy.

Web Summary : Sadhvi Prem Bai's suspicious death in Rajasthan raises questions. A compounder's injection and a post-death Instagram post fuel speculation of foul play and a deeper conspiracy. Police investigate.