पती कामावर गेल्यावर वहिनीला भेटायला घरी येत होता दीर, भावाला समजलं आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 10:02 IST2023-01-19T10:02:17+5:302023-01-19T10:02:41+5:30

Crime News : मुकेश मजुरीचं काम करत होता आणि तो जेव्हाही कामासाठी बाहेर जात होता तेव्हा त्याची पत्नी तिच्या चुलत दीर महिपालसोबत अनैतिक संबंध ठेवत होती.

Rajasthan sikar murder case devar bhabhi illicit relationship | पती कामावर गेल्यावर वहिनीला भेटायला घरी येत होता दीर, भावाला समजलं आणि मग....

पती कामावर गेल्यावर वहिनीला भेटायला घरी येत होता दीर, भावाला समजलं आणि मग....

Crime News : दीर आणि वहिनीच्या अनैतिक संबंधाच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. पण सध्या अशाच एका नात्याची कहाणी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील या घटनेमुळे पोलिसांसोबतच पूर्ण जिल्ह्यातील लोक हैराण झाले होते. ही घटना सीकरच्या खंडेलामधील आहे.

या प्रकरणी 14 तासात पोलिसांना एका तरूणाचा मृतदेह सापडला होता. हा मृतदेह त्यांना एका विहिरीत सापडला. मृत तरूणाचं नाव मुकेश होतं. असं सांगण्यात आलं की, 10 वर्षाआधी मुकेशचं लग्न संतोष नावाच्या एका महिलेसोबत झालं होतं. मुकेश मजुरीचं काम करत होता आणि तो जेव्हाही कामासाठी बाहेर जात होता तेव्हा त्याची पत्नी तिच्या चुलत दीर महिपालसोबत अनैतिक संबंध ठेवत होती. हे जेव्हा मुकेशला समजलं तर त्याने पत्नी संतोषला मारहाण केली.

मारहाण केल्याननंतर संतोषने आपल्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. तेच घटनेच्या 8 दिवसांआधी मुकेश गायब झाला होता आणि तो शेवटचा महिपाल आणि मावस भाऊ रंजीतसोबत दिसला होता. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी महिपालला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी केली. 
चौकशी दरम्यान त्याने सांगितलं की, रंजीतसोबत मिळून मुकेशला गावातील विहिरीत टाकलं होतं. तो म्हणाला त्याने दारून त्याच्यासोबत मारहाण केली आणि नंतर त्याला विहिरीत ढकलून दिलं.

याप्रकरणी महिपालला अटक करण्यात आली होती. त्याने कबूल केलं होतं की, त्याला त्याचा मावस भाऊ रंजीतने साथ दिली होती. तेच हे सगळं समोर आल्यावर रंजीतने रेल्वेखाली येऊन आपला जीव दिला होता. तो 6 बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ होता. याप्रकरणी मुकेशची आरोपी पत्नी संतोषला पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

Web Title: Rajasthan sikar murder case devar bhabhi illicit relationship