शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

आता बोला! 'तू काळा आहेस' म्हणत पत्नी पतीला सोडून गेली, पती न्यायासाठी कोर्टाच्या दारात....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 2:16 PM

Wife harassed husband for his dark complexion : अपमान झाल्यावर या व्यक्तीने मदतीसाठी कोर्टात धाव घेतली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार आता राजस्थान पोलिसांनी पत्नी विरोधात तक्रार दाखल केली आहे.

(Image Credit : telegraph.co.uk)

राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात एका व्यक्तीला त्याची पत्नी याकारणाने सोडून गेली कारण त्याचा रंग काळा (Wife harassed husband for his dark complexion) आहे. पतीने आरोप लावला आहे की त्याची पत्नी म्हणाली की, 'तू काळा आहेस, मी तुझ्यासोबत राहू शकत नाही'. पत्नीकडून अशाप्रकारे अपमान झाल्यावर या व्यक्तीने मदतीसाठी कोर्टात धाव घेतली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार आता राजस्थान पोलिसांनी पत्नी विरोधात तक्रार दाखल केली आहे.

ही पूर्ण घटना श्रीविजयनगरमध्ये राहणाऱ्या सुमितने कोर्टाच्या माध्यमातून पोलिसात आता पत्नी विरोधात अत्याचाराची केस दाखल केली आहे. सुमितचं लग्न २०१ मध्ये सुमरतीसोबत झालं होतं आणि दोघांना एक मुलगीही आहे. पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, सुमितने पत्नीवर मानसिक, आर्थिक आणि शारीरिक अत्याचाराचा आरोप लावला आहे. तो म्हणाला की, त्याचा रंग काळा असल्याने पत्नीने त्याच्यासोबत राहण्यास नकार देत आहे. (हे पण वाचा : मुलगी झाल्याने तू अपशकुनी; विवाहितेला दिली क्रूरतेची वागणूक)

सुमितने आरोप लावला आहे की, जेव्हा त्याचं लग्न झालं तेव्हा त्याने कोणतही हुंडा घेतला नव्हता. सुरूवातीला सगळं काही ठीक होतं. पण नंतर पत्नी त्याला काळ्या रंगावरून टोमणे मारणं सुरू केलं. आता ती म्हणते की, काळ्या रंगामुळे तिला त्याच्यासोबत रहायचं नाहीये. इतकेच नाही तर सुमितने पत्नीवर ५० हजार रूपये हडपल्याचा आरोपही लावला आहे. काही दिवसांपूर्वी भावाच्या उपचारासाठी तिने ५० हजार रूपये दिले होते. पण ते पैसे परत करण्यास ते नकार देत आहे. (हे पण वाचा : उंची कमी असल्याने तरूणाला नवरी मिळेना, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन म्हणाला - मॅडम, माझं लग्न लावून द्या!)

सुमितनुसार गेल्या महिन्यात ११ तारखेला पत्नीचे पिता आणि तिचे दोन भाऊ त्याच्या घरी आले होते. त्या दिवशी खाण्याच्या पदार्थात नशेचे पदार्थ मिश्रित करण्यात आले होते. त्यानंतर त्याला हात-पाय बांधून मारझोड करण्यात आली. सुमितने आरडाओरड केल्यावर शेजारी आले होते. सुमितने आरोप लावला की, त्याच रात्री त्याची पत्नी २५ हजार रूपये रक्कम आणि दागिने घेऊन घर सोडून गेली

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानmarriageलग्नDivorceघटस्फोट