फेसबुकवर मैत्रीनंतर तरूणीला दिलं लग्नाचं आमिष, हॉटेलमध्ये मित्रासोबत केला गॅंगरेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 12:38 IST2022-05-27T12:37:51+5:302022-05-27T12:38:16+5:30

Rajasthan Crime News : एडीसीपी निशांत भारद्वाज यांनी सांगितलं की, उदयमंदीर भागात राहणाऱ्या २४ वर्षीय तरूणीची २५ नोव्हेंबर २०२१ ला रविंद्र सिंहसोबत फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती.

Rajasthan Jodhpur : After friendship Facebook girl promise marriage immoral work hotel | फेसबुकवर मैत्रीनंतर तरूणीला दिलं लग्नाचं आमिष, हॉटेलमध्ये मित्रासोबत केला गॅंगरेप

फेसबुकवर मैत्रीनंतर तरूणीला दिलं लग्नाचं आमिष, हॉटेलमध्ये मित्रासोबत केला गॅंगरेप

Rajasthan Crime News : राजस्थानच्या जोधपूरमधील एका तरूणीसोबत लग्नाचं आमिष दाखवून तिच्या मित्राने आणि इतर एका व्यक्तीने गॅंगरेप केला. तरूणीने याबाबतची माहिती आपल्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे.

एडीसीपी निशांत भारद्वाज यांनी सांगितलं की, उदयमंदीर भागात राहणाऱ्या २४ वर्षीय तरूणीची २५ नोव्हेंबर २०२१ ला रविंद्र सिंहसोबत फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर दोघांची जवळीक वाढली रविंद्र सिंहने तरूणीला सांगितलं की, तो तिच्यासोबत लवकरच लग्न करेल. रविंद्र सिंह गेल्या वर्षी २५ नोव्हेंबरला तरूणीला राई बाग भागातील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर रेप केला. त्यानंतर तरूणी गर्भवती झाली. रविंद्र सिंहने यानंतर तिचा गर्भपात केला.

२२ मे रोजी रविंद्र सिंह जोधपूरला पोहोचला आणि एका हॉटेलमध्ये तरूणीला बोलवलं. यावेळी रविंद्रचा मित्रही सोबत होता. आरोप आहे की, रविंद्र आणि त्याच्या मित्राने तरूणीसोबत गॅंगरेप केला आणि मारहाणही केली. तरूणीने याची माहिती कुटुंबियांना दिली. यानंतर आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरूणीचं मेडिकल केलं. आरोपींवर पोलीस कारवाई करत आहेत.

एडीसीपी निशांत भारद्वाज या प्रकरणाची चौकशी करत आहेत. ते म्हणाले की, पीडितेने तक्रार दाखल केली. तिची फेसबुकच्या माध्यमातून तरूणासोबत ओळख झाली होती. त्यानंतर तरूण जोधपूरला आला होता. त्याने लग्नाचं आमिष दाखवत तरूणीसोबत रेप केला होता. रेडिसन हॉटेलमध्ये लग्नाचं आमिष दाखवून त्याने रेप केला. पीडितेच मेडिकल केलं आहे.
 

Web Title: Rajasthan Jodhpur : After friendship Facebook girl promise marriage immoral work hotel