तरूणी बोलली नाही म्हणून तरूणाने केलं धक्कादायक कृत्य, एकतर्फी प्रेमातील कारनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 15:40 IST2021-10-09T15:40:45+5:302021-10-09T15:40:59+5:30

Rajasthan Crime News : काही दिवसांपर्यंत दोघांमध्ये बोलणं सुरू होत. पण तरूणीच्या परिवाराने समजावून सांगितल्यावर तिने तरूणासोबत बोलणं बंद केलं.

Rajasthan Crime News : One side lover killed women, then surrender police | तरूणी बोलली नाही म्हणून तरूणाने केलं धक्कादायक कृत्य, एकतर्फी प्रेमातील कारनामा

तरूणी बोलली नाही म्हणून तरूणाने केलं धक्कादायक कृत्य, एकतर्फी प्रेमातील कारनामा

राजस्थान (Rajasthan)च्या झालावाड जिल्ह्यातील बाकीपुरा भागात एकतर्फी प्रेमातून एका तरूणाने एका तरूणीची धारदार शस्त्राने वार करत हत्या केली. घटनेनंतर आरोपीने पोलिसांसमोर येऊन आत्मसमर्पण केलं. मीडिया रिपोर्टनुसार, झालावाडच्या बाकीपुरा भागातील जुबेर नावाचा तरूण गावातील तरूणी पूजा मेहरवर प्रेम कत होता.

काही दिवसांपर्यंत दोघांमध्ये बोलणं सुरू होत. पण तरूणीच्या परिवाराने समजावून सांगितल्यावर तिने तरूणासोबत बोलणं बंद केलं. यादरम्यान तरूणीच्या परिवाराने तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवलं होतं. अशात जेव्हा तरूणी पूजा शेतात सोयाबीन आणण्यासाठी जात होती तेव्हा तिथे जुबेर आला. त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला. ज्यामुळे ती रक्तबंबाळ झाली. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. मात्र, तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. 

घटनेनंतर आरोपी जुबेर खान याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. यानंतर गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तेव्हा पोलिसांची फौज तैनात करण्यात आली होती. तेच पोलीस अधिक्षक डॉ. किरण कंग सिद्धू हेही घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर तरूणीच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करून मृतदेह परिवाराकडे सोपवण्यात आला. पोलीस याप्रकरणाची चौकशी करत आहेत. 
 

Web Title: Rajasthan Crime News : One side lover killed women, then surrender police