३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 16:14 IST2025-08-24T16:14:09+5:302025-08-24T16:14:58+5:30
Rajasthan Crime: पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले.

३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
Rajasthan Crime: राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३० वर्षीय महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने ६० वर्षीय पतीची निर्घृण हत्या केली. भरतपूर जिल्ह्यातील बयाना भागात ही घटना घडली. पतीच्या हत्येनंतर तिने स्वतः पोलिसांकडे हरवल्याची तक्रार केली. मात्र, पोलिसांच्या तपासात संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी आरोपी महिलेसह तिचा प्रियकर आणि इतर साथीदारांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण करौलीच्या बालघाट पोलिस स्टेशन परिसरातील मुडिया गावचे आहे. २० ऑगस्टच्या रात्री ३० वर्षीय कुसुम देवी तिचा ६० वर्षीय पती देवी सहाय याला काही बहाण्याने जंगलात घेऊन गेली. कुसुमचा प्रियकर पिंटू आधीच तिथे दबा धरुन बसला होता. पिंटूने आपल्या साथीदारांच्या मदतीने देवी सहायचे अपहरण केले आणि नंतर त्याचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर मृतदेह भरतपूर जिल्ह्यातील बयाना सदर पोलीस स्टेशन परिसरातील भिडवली गावातील जंगलातील विहिरीत टाकला.
पोलिसांना संशय आल्यावर आरोपी महिलेचे कॉल डिटेल्स तपासले, ज्यात ती अनेक तास एका व्यक्तीशी बोलत असल्याचे उघड झाले. पत्नीची कसुन चौकशी केल्यावर तिने हत्येची कबुली दिली. तिच्या सांगण्यावरुन पोलीस आणि एसडीआरएफ पथकाने विहिरीतून मृतदेह ताब्यात घेतला. यासोबतच पोलिसांनी आरोपी पत्नी कुसुम देवी, तिचा प्रियकर पिंटू आणि काही साथीदारांना अटक केली आहे.