शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
2
'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचलला टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
3
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
4
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
5
हंटाव्हायर बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
6
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
7
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
8
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
9
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
10
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
11
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
12
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
13
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
14
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
15
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
16
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
17
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
18
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
19
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
20
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 19:25 IST

तिथे सोनमचा इशारा मिळताच विशालने राजाच्या डोक्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर इतर आरोपींसोबत झटापट झाली. त्यात राजाची हत्या करण्यात आली. 

Raja Raghuvanshi Murder Case: मेघालय पोलिसांच्या चौकशीत अखेर सोनम रघुवंशी हिने पती राजाच्या हत्येचा कट रचल्याचा गुन्हा कबूल केला आहे. राजा रघुवंशी हत्या प्रकरणी पोलिसांनी गाजीपूर येथे सरेंडर केलेल्या सोनमला शिलांगला आणले. तिथून या घटनेचा तपास करत वेगवेगळे धागेदोरे उघड केले. त्यानंतर पोलिसांनी या घटनेतील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी आणि तिचा कथित प्रियकर राज कुशवाह या दोघांना समोरासमोर बसवून चौकशी केली तेव्हा सोनमने तिचा गुन्हा कबूल केला. राजाच्या हत्येचे पूर्ण प्लॅनिंग ९ तासांत केले होते.

त्या गुन्हेगारांची राजासोबत भेट कधी झाली?

२३ मे २०२५ रोजी पहाटे ५.३० वाजता सोनम आणि राजा शिप्रा होम स्टेमधून बाहेर पडले. त्यानंतर अर्ध्या तासांनी दोघे चेरापूंजी फिरण्यासाठी निघाले. सोनमचे ३ साथीदार त्यांनीही त्याचवेळी हॉटेलमधून चेक आऊट केले. सकाळी १० च्या सुमारास दोघे ट्रेक करत २००० हजार पायऱ्या चढले तेव्हा आनंद, आकाश आणि विशाल या आरोपींसोबत राजाची भेट झाली. याचवेळी त्या ५ जणांना गाईडने पाहिले होते. ज्या गाईडच्या जबाबामुळे बेपत्ता प्रकरण सोडवण्यात पोलिसांना मदत मिळाली. 

जसजसे हल्लेखोर आणि राजा यांच्यात बोलणे सुरू झाले तसे सोनम त्यांच्यामागून चालत होती. दुपारी १२.३० च्या सुमारास सोनमने राजाची आई उमा रघुवंशी यांना फोन केला आणि बोलण्यात चालून चालून पाय थकल्याचे सांगितले. त्याचवेळी आईने राजाशी केलेले बोलणे अखेरचे ठरले. दुपारी १ ते १.३० च्या दरम्यान हे लोक एका पार्किंग जवळ पोहचले. तिथे सोनमचा इशारा मिळताच विशालने राजाच्या डोक्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर इतर आरोपींसोबत झटापट झाली. त्यात राजाची हत्या करण्यात आली. 

राजाचा मृतदेह २.३० वाजता फेकला

पतीच्या हत्येनंतर २.१५ मिनिटांनी सोनमने तिच्या फोनवरून सात जन्मों का साथ है असं म्हणत एक पोस्ट केली. त्यानंतर आरोपींनी २ वाजून ३० मिनिटांनी राजाचा मृतदेह पार्किंगजवळील दरीत फेकून दिला. सोनम आणि राजाचे लग्न ११ मे रोजी झाले होते. लग्नानंतर लगेच राजाचा काटा काढण्याचे प्लॅनिंग सुरू झाले होते. हा प्लॅन इतर कुणी नाही तर त्याची पत्नी सोनमने राज कुशवाहसोबत मिळून बनवला होता असं पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, इंदूरमध्ये लग्नानंतर सोनम आणि राजा हनीमूनसाठी मेघालयला गेले होते. तिथे २३ मे रोजी नोंगरियाट गावातील होम स्टेमधून चेक आऊट केल्यापासून काही तासांत ते दोघे बेपत्ता झाले. ही जागा त्या जागेपासून २० किमी दूर आहे जिथे २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला होता. सोनमने राजाची हत्या करण्यासाठी आरोपींना २० लाख रुपये दिले होते.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी