शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 18:59 IST

मेघालयात राजा रघुवंशीची निर्घृण हत्या करण्यात आली, सध्या या प्रकरणाची देशभरात चर्चा सुरू आहे.

Raja Raghuwanshi Murder Case:मध्य प्रदेशातील इंदूर येथील व्यापारी राजा रघुवंशी यांच्या हत्येची देशभरात चर्चा सुरू आहे. पत्नी सोनम हिनेच प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, आता या हत्येत वापरलेला मोठ्या आकाराचा चाकू/कोयता पोलिसांच्या हाती लागला आहे. याच चाकूने राजावर पाठीमागून अनेक वार करण्यात आले, ज्यात त्याचा जागीच मृ्त्यू झाला. 

पोलिस तपासात असे आढळून आले की, राजावर पाठीमागून पहिला वार आरोपी विशाल चौहानने केला होता. हत्येच्या वेळी राजाने स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण समोर चार हल्लेखोर असल्यामुळे राजा हतबल होता. या संघर्षादरम्यान आरोपी आकाश राजपूतच्या शर्टवर रक्त लागले होते. हा महत्त्वाचा पुरावा ठरला, ज्यामुळे पोलिसांना खटला तपासाच्या दिशेने मदत झाली.

काय आहे राजा रघुवंशी प्रकरण?इंदूरचा रहिवासी राजा रघुवंशी आणि सोनम यांचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. लग्नानंतर दोघे हनीमुनसाठी मेघालयाला गेले. तिथे गेल्यानंतर दोघे अचानक बेपत्ता झाले. घरच्यांनी अनेकवेळा फोन केले, पण त्यांचे फोन बंद होते. सुरुवातीला ही अपहरणाचे प्रकरण वाटले, पण काही दिवसांच्या तपासात मेघालय पोलिसांना राजाचा मृतदेह एका दरीत आढळला. पण, सोनम अद्याप बेपत्ताच होती.

राजाला मारुन सोनमचे अपहरण केल्याचा संशय पोलिसांना आला. पण, त्यानंतर सोनमला ७ जून रोजी उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये  अटक करण्यात आली. सोनमनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याचे तपासात समोर आले. सोनम आधी राजाला निर्जण स्थळी घेऊन गेली, तिथे तबा धरुन बसलेल्या तिघांनी राजावर सपासप वार केले. हत्येनंतर राजाचा मृतदेह दरीत फेकून दिला. सध्या हे प्रकरण संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोनम, तिचा प्रियकर राज कुशवाह, विशाल, आकाश आणि आनंद कुर्मी यांना अटक केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदारLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट