प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 18:59 IST2025-06-16T18:57:39+5:302025-06-16T18:59:30+5:30

मेघालयात राजा रघुवंशीची निर्घृण हत्या करण्यात आली, सध्या या प्रकरणाची देशभरात चर्चा सुरू आहे.

Raja Raghuwanshi Murder Case: police found the knife used for the murder | प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Raja Raghuwanshi Murder Case:मध्य प्रदेशातील इंदूर येथील व्यापारी राजा रघुवंशी यांच्या हत्येची देशभरात चर्चा सुरू आहे. पत्नी सोनम हिनेच प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, आता या हत्येत वापरलेला मोठ्या आकाराचा चाकू/कोयता पोलिसांच्या हाती लागला आहे. याच चाकूने राजावर पाठीमागून अनेक वार करण्यात आले, ज्यात त्याचा जागीच मृ्त्यू झाला. 

पोलिस तपासात असे आढळून आले की, राजावर पाठीमागून पहिला वार आरोपी विशाल चौहानने केला होता. हत्येच्या वेळी राजाने स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण समोर चार हल्लेखोर असल्यामुळे राजा हतबल होता. या संघर्षादरम्यान आरोपी आकाश राजपूतच्या शर्टवर रक्त लागले होते. हा महत्त्वाचा पुरावा ठरला, ज्यामुळे पोलिसांना खटला तपासाच्या दिशेने मदत झाली.

काय आहे राजा रघुवंशी प्रकरण?
इंदूरचा रहिवासी राजा रघुवंशी आणि सोनम यांचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. लग्नानंतर दोघे हनीमुनसाठी मेघालयाला गेले. तिथे गेल्यानंतर दोघे अचानक बेपत्ता झाले. घरच्यांनी अनेकवेळा फोन केले, पण त्यांचे फोन बंद होते. सुरुवातीला ही अपहरणाचे प्रकरण वाटले, पण काही दिवसांच्या तपासात मेघालय पोलिसांना राजाचा मृतदेह एका दरीत आढळला. पण, सोनम अद्याप बेपत्ताच होती.

राजाला मारुन सोनमचे अपहरण केल्याचा संशय पोलिसांना आला. पण, त्यानंतर सोनमला ७ जून रोजी उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये  अटक करण्यात आली. सोनमनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याचे तपासात समोर आले. सोनम आधी राजाला निर्जण स्थळी घेऊन गेली, तिथे तबा धरुन बसलेल्या तिघांनी राजावर सपासप वार केले. हत्येनंतर राजाचा मृतदेह दरीत फेकून दिला. सध्या हे प्रकरण संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोनम, तिचा प्रियकर राज कुशवाह, विशाल, आकाश आणि आनंद कुर्मी यांना अटक केली आहे. 

Web Title: Raja Raghuwanshi Murder Case: police found the knife used for the murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.