"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 20:33 IST2025-06-18T20:32:40+5:302025-06-18T20:33:57+5:30

गेल्या ११ मे रोजी सोनमचे लग्न झाले. २० मे रोजी दोघेही हनिमूनसाठी निघाले. २३ मे रोजी दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार आली. याच काळात राजाची हत्या करण्यात आली. २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला...

raja raghuvanshi murder case shillong police questions sonam raghuvanshi family | "सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!

"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!

शिलॉन्ग पोलिसांनी राजा रघुवंशी मर्डर केसमधील आरोपी पत्नी सोनम रघुवंशीच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली. यासंदर्भात खुद्द सोनम रघुवंशीचा भाऊ गोविंद रघुवंशी यांनी माहिती दिली. सोनमचे आई-वडील आणि भाऊ गोविंद यांना पोलिसांनी काही प्रश्न विचारले. सोनमच्या वागण्या-बोलण्यासंदर्भात आणि कामासंदर्भात प्रश्न करण्यात आले. सोनमच्या घरात ठेवलेल्या वस्तूंचीही तपासणी करण्यात आली. दरम्यान, आपण संजय वर्मा नावाच्या कुठल्याही व्यक्तीला ओळखत नाही, असे गोविंद रघुवंशी यांनी म्हटले आहे.

सोनमच्या कुटुंबीयांना विचारण्यात आलेले प्रश्न -

सोनमचे वर्तन कसे होते?
सोनमचे लग्नापूर्वी आणि नंतरचे वर्तन कसे होते?
राजाच्या घरून आल्यानंतर सोनमच्या वर्तनात काही फरक जाणवला?
सोनम फोनवर बराच वेळ कुणाला बोलत होती?
सोनम आणि राजच्या प्रेमसंबंधाची काही कल्पना होती का?
सोनमने आईने लग्न न करण्याची धमकी दिली होती का?
सोनम शिलाँगला गेल्याची माहिती केव्हा मिळाली?
राज व्यतिरिक्त इतर आरोपींचे घरी येणे जाणे होते का?
सोनमच्या खात्यात एवढे पैसे कुणाचे होते आणि ते कुठून आले?
हवाला कनेक्शन, संजय वर्मा आणि जितेंद्र रघुवंशी यांच्याबद्दलही प्रश्न विचारण्यात आले

सोनमने गुन्हा कबूल केला - पोलीस
मेघालय पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सोनम रघुवंशीने तिचा गुन्हा कबूल केला आहे. सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाहच्या साथीने तिच्या पतीची हत्या केली. मंगळवारी (१७ जून) पोलिसांनी हत्येत वापरलेले दुसरे शस्त्रही जप्त केले. राजा रघुवंशीवर दोन शस्त्रांनी वर करण्यात आले आणि त्याचा मृतदेह दरीत फेकून देण्यात आला.

२ जूनला सापडला राजाचा मृतदेह - 
गेल्या ११ मे रोजी सोनमचे लग्न झाले. २० मे रोजी दोघेही हनिमूनसाठी निघाले. २३ मे रोजी दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार आली. याच काळात राजाची हत्या करण्यात आली. २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला. ९ जून रोजी सोनम रघुवंशीला गाझीपूरमध्ये अटक करण्यात आली. यानंतर या प्रकरणात अनेक मोठे खुलासे झाले आहेत.
 

Web Title: raja raghuvanshi murder case shillong police questions sonam raghuvanshi family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.