शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 20:51 IST

१० दिवसांपूर्वी प्रयागराज जंक्शनवरून एक तरुण आपल्या पत्नीसोबत गोव्याला जात असताना अचानक बेपत्ता झाला.

मध्य प्रदेशातील इंदूरच्या राजा रघुवंशीचे मेघालयात झालेले हत्याकांड अजूनही लोक विसरलेले नाहीत. हनीमूनसाठी गेलेल्या राजा रघुवंशीची पत्नी सोनम आणि तिच्या प्रियकराने सुपारी देऊन त्याची हत्या केली होती. अशीच एक धक्कादायक घटना आता उत्तर प्रदेशातीलप्रयागराज येथून समोर आली आहे. मात्र, येथे नशिबाने पती बचावला आणि परत घरी आला.

१० दिवसांपूर्वी प्रयागराज जंक्शनवरून एक तरुण आपल्या पत्नीसोबत गोव्याला जात असताना अचानक बेपत्ता झाला. त्यानंतर, बेपत्ता तरुणाची पत्नी तिच्या माहेरी पोहोचली आणि नंतर पोलीस ठाण्यात जाऊन तिने पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. मात्र, तब्बल दहा दिवसांनी तो तरुण घरी परतला आणि त्यानंतर संपूर्ण कहाणीचे सत्य समोर आले.

गोव्यात काम करणारा तरुण अचानक झाला बेपत्ताअचानक बेपत्ता झालेला आणि नंतर १० दिवसांनी परतलेला हा तरुण सरयामरेज पोलीस स्टेशन परिसरातील एका गावाचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या तरुणाचे लग्न तीन वर्षांपूर्वी सुरियावन पोलीस स्टेशन परिसरातील एका गावातील मुलीशी झाले होते. हा तरुण गोव्यात आपल्या वडिलांसोबत एका कंपनीत काम करतो. विशेष म्हणजे, सहा महिन्यांपूर्वी या तरुणाची पत्नीही त्याच्यासोबत राहण्यासाठी गोव्यात गेली होती.

पत्नीच्या ओळखीच्या लोकांनी जंक्शनवर केले अपहरण३ जून रोजी तो तरुण आपल्या पत्नीला सुरियानवा येथील तिच्या माहेरी घेऊन गेला. त्यानंतर ४ जून रोजी दोघेही गोव्याला जाण्यासाठी प्रयागराज जंक्शनवर पोहोचले. प्रयागराज जंक्शनवर ट्रेनमध्ये चढण्यापूर्वीच तो तरुण अचानक बेपत्ता झाला. तरुण बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी सरयामरेज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तरुण १० दिवसांनी घरी परतला, तेव्हा त्याने सांगितले की, त्याच्या पत्नीला ओळखणारे दोन तरुण जंक्शनवर आले होते. पत्नीसमोरच त्या ओळखीच्या लोकांनी त्याला मारहाण केली आणि कोलकात्याला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसवून कोलकात्याला नेले. त्यांनी त्याच्या पत्नीला काहीही केले नाही, असे त्याने सांगितले. कोलकात्यामध्ये त्यांनी त्याचे अपहरण केले आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तो कसा तरी त्यांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाला आणि १३ जून रोजी घरी पोहोचला.

पोलिसांची भूमिका आणि पुढील तपासतरुणाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांनी सरायमरेज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सरायमरेज पोलीस ठाण्याने मात्र तरुणाच्या कुटुंबीयांना सुरियावन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पत्नीच्या ओळखीच्या लोकांनी हे कृत्य का केले, यामागे नेमके काय कारण होते, याचा शोध पोलीस घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPrayagrajप्रयागराजgoaगोवाhusband and wifeपती- जोडीदार