'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 13:47 IST2025-06-09T13:42:33+5:302025-06-09T13:47:31+5:30
इंदूर एसपी दंडोतिया पुढे म्हणाले, हे प्रकरण मेघालयातील सोहरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. यामुळे तपासही त्यांच्याकडूनच केला जाईल. सर्व तपास मेघालय पोलिस कायदेशीररित्या करतील, इंदूर पोलीस तपासासंदर्भात आवश्यक असलेली सर्व मदत करतील.

'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात त्यांच्या पत्नीसह ३ जणांना अटक झाल्यानंतर, इंदूर पोलिसांचे निवेदन समोर आले आहे. 'या प्रकरणात राज कुशवाहलाही अटक करण्यात आल्याचे इंदूर एसपींनी म्हणाले आहे. राज ही तीच व्यक्ती आहे, जीचे सोनमसोबत अफेअर सुरू होते. याशिवाय, चौकशीदरम्यान सर्व काही उघड होईल, असेही इतूर पोलिसांनी म्हटले आहे.
राजा रघुवंशी मर्डर केससंदर्भात माहिती देताना इंदूर पोलिसांनी म्हटले आहे की, इंदूर पोलीस आणि मेघालय पोलीस यांच्याकडून सुरू असलेल्या संयुक्त अभियानात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यात पहिले नाव राज कुशवाहचे आहे. तर दुसरे नाव विशाल चौहान आणि तिसरे नाव आकाश राजपूतचे आहे. याशिवाय आणखी एक आरोपी फरार असून मेघालय पोलीसही संपर्कात आहेत, असे इंदूर एसपी राजेश दंडोतिया यांनी म्हटले आहे.
इंदूर एसपी दंडोतिया पुढे म्हणाले, हे प्रकरण मेघालयातील सोहरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. यामुळे तपासही त्यांच्याकडूनच केला जाईल. सर्व तपास मेघालय पोलिस कायदेशीररित्या करतील, इंदूर पोलीस तपासासंदर्भात आवश्यक असलेली सर्व मदत करतील. दरम्यान, एसपी दंडोतिया खऱ्या मारेकऱ्यासंदर्भात खुलासा न करत म्हणाले, अद्याप अशी कुठलेही गोष्ट समोर आलेली नाही. या सर्व गोष्टी चौकशीतूनच उघड होतील. गाजीपूर पोलीस ठाण्यातून सोनमने आपल्या भावाला फोन केला होता. यानंतर, गाझीपूर पोलिसांनी तेथे जाऊन तिला अटक केली, असेही इंदूर पोलिसांनाही म्हटले आहे.