शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

पॉर्नोग्राफी रॅकेट समोर आल्यानंतर राज कुंद्रानं बदलला होता फोन; झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 7:58 AM

Raj Kundra Case : फेब्रुवारी महिन्यात राज कुंद्रानं बदलला होता फोन. पोलिसांनुसार राज कुंद्राकडून चौकशीत सहकार्य नाही. 

ठळक मुद्देफेब्रुवारी महिन्यात राज कुंद्रानं बदलला होता फोन. पोलिसांनुसार राज कुंद्राकडून चौकशीत सहकार्य नाही. 

पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याच्याबाबत निरनिराळे खुलासे होताना दिसत आहेत. फेब्रुवारी २०२१ पासून हे प्रकरण हळूहळू समोर येऊ लागलं होतं. यादरम्यान, राज कुंद्राचं नाव पहिल्यांदा समोर आलं होतं. आता या प्रकरणी आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांनुसार जेव्हा फेब्रुवारी महिन्यात पॉर्नोग्राफी रॅकेटचा पर्दाफाश झाला होता, त्यावेळी राज कुंद्रानं आपला मोबाईल बदलला होता. 

मुंबई क्राईम ब्रान्चचे अधिकारी या प्रकरणी बारीक तपास करत आहे. त्यांच्या माध्यमातून नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. फेब्रुवारी महिन्यात ज्यावेळी पॉर्नोग्राफी रॅकेट समोर आलं त्यावेळी राज कुंद्रानं आपला फोन बदलला होता. त्याला ताब्यात घेतल्यानंतर आता या प्रकरणी पोलिसांकडून खुलासा करण्यात आला आहे. राज कुंद्रा आणि रायन थोरपे याला मुंबईच्या क्राईम ब्रान्चच्या प्रॉपर्टी सेलनं अटक केली आहे. 

सापडलं नवं बँक खातं मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा विभागाला शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या एका ज्वाइंट अकाऊंटचा शोध लागला आहे. पंजाब नॅशनल बँकेत (PNB) शिल्पा आणि राज कुंद्रा यांचं ज्वाइंट अकाऊंट सापडलं आहे. राज कुंद्राची सारी अवैध पद्धतीनं कमावलेली कमाई याच अकाऊंटमध्ये जमा होत असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच या अकाऊंटमध्ये आजवर कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. हॉटशॉट्स आणि बॉलीफेम या अॅप्समधून मिळणारी कमाई याच अकाऊंटमध्ये जमा केली जात होती, अशी माहिती गुन्हे शाखेच्या चौकशीत समोर आली आहे.

पीएनबी बँकेतील या वादग्रस्त बँक अकाऊंटमध्ये थेट व्यवहार न केले जाता विविध अकाऊंट्सच्या माध्यमातून पैसे जमा केले जात होते, असंही सांगितलं जात आहे. याशिवाय याच बँकेत राज कुंद्रा याचं सिंगल अकाऊंट देखील असल्याची माहिती समोर आली आहे. पण या खात्यात २०१६ पासून कोणताही व्यवहार झालेला नाही. इतकंत काय तर या खात्यात खातं सुरू ठेवण्यासाठीची आवश्यक रक्कम देखील जमा नाही. राज कुंद्राच्या बँक अकाऊंट्सचा शोधाशोध घेण्यासाठी गुन्हे शाखेनं चार सदस्यीय टीम नियुक्त केली आहे. 

टॅग्स :Raj Kundraराज कुंद्राShilpa Shettyशिल्पा शेट्टीCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईMONEYपैसाPunjab National Bankपंजाब नॅशनल बँक