Raj Kundra : पॉर्न चित्रपट निर्मितीतून राज कुंद्रा दररोज कमवत होता लाखो रुपये; ७.५० कोटी रुपये गोठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 08:46 PM2021-07-21T20:46:32+5:302021-07-21T21:57:24+5:30

Raj Kundra : बँक डिटेल्सनुसार राज कुंद्रा आणि त्यांची कंपनी दिवसाला ६ ते ७ लाख रुपये कमवत होते.

Raj Kundra: Raj Kundra was earning lakhs of rupees every day from making porn movies; 7.50 crore frozen | Raj Kundra : पॉर्न चित्रपट निर्मितीतून राज कुंद्रा दररोज कमवत होता लाखो रुपये; ७.५० कोटी रुपये गोठवले

Raj Kundra : पॉर्न चित्रपट निर्मितीतून राज कुंद्रा दररोज कमवत होता लाखो रुपये; ७.५० कोटी रुपये गोठवले

Next
ठळक मुद्देआता राज कुंद्रा याच्याबाबत अनेक खळबळजनक खुलासे समोर येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्यांच्या खात्यात दररोज होणारी ६ - ७ लाख रुपये जमा. 

मुंबई - अश्लील चित्रपत निर्मिती प्रकरणात अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांची २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आता राज कुंद्रा याच्याबाबत अनेक खळबळजनक खुलासे समोर येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्यांच्या खात्यात दररोज होणारी ६ - ७ लाख रुपये जमा. 

राज कुंद्राचे काही बँक डिटेल्स पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यात Hotshots डिजिटल प्लॅटफॉर्मवर अश्लील चित्रपट टाकून राज कुंद्रा याच्या खात्यात रोज ६-७ लाख रुपये जमा होत होते. तसेच वेगवेगळ्या बँक खात्यातून ७.५० होती रुपये गोठवण्यात आले आहेत. 

बँक डिटेल्सनुसार राज कुंद्रा आणि त्यांची कंपनी दिवसाला ६ ते ७ लाख रुपये कमवत होते. त्यांच्या बँक अकाऊंटवर रोज लाखो रुपये जमा होत असल्याचे त्याच्या बँक डिटेल्सवरुन दिसून आले आहे. राज कुंद्राच्या डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान बँक खात्यात जमा झालेली डिटेल्स हाती लागली आहे. 

राज कुंद्रा याच्या बँक खात्यात झालेल्या ट्रांझॅक्शनमध्ये २२ डिसेंबर २०२१ला ३ लाख रुपये, २५ डिसेंबर २०२० ला १ लाख रुपये, २६ डिसेंबर २०२० ला १० लाख रुपये, २८ डिसेंबर २०२०ला ५० हजार, ३ जानेवारी २०२१ २ लाख ५ हजार, १० जानेवारी २०२१ ला ३ लाख, १३ जानेवारी २०२१ रोजी २ लाख, २० जानेवारी २०२१ ला १ लाख, २३ जानेवारी २०२१ ला ९५ हजार तर ३ फेब्रुवारी २०२१ ला २ लाख ७० हजार रुपये जमा झाल्याचे दिसून आले आहे.

Web Title: Raj Kundra: Raj Kundra was earning lakhs of rupees every day from making porn movies; 7.50 crore frozen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app