शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
2
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
3
Top Marathi News Live: विजय यांची बहुमत जुळवण्यासाठी धडपड, आणखी एका पक्षाला पाठवले पत्र
4
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
5
मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 
6
हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा
7
प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
8
Mangala Thoke : शिकण्याची जिद्द! दिवसा घरकाम, रात्री अभ्यास; ६८ वर्षांच्या आजींनी ६०% गुणांसह पास केली बारावी
9
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
10
अमेरिकेत विमानाला अपघात, लँडिंग करताना हायवेवरील ट्रकला धडकलं आणि...; व्हिडीओ व्हायरल!
11
Samudrik Shastra: चेहरा बघून ओळखा स्वभाव! गोल, चौकोनी की अंडाकृती? काय सांगतो तुमचा 'फेस शेप'?
12
कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात केले पर्दापण; आज मानसिक आजाराशी लढतोय 'हा' खेळाडू
13
अनिल परब यांची राज्यभर गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातून निर्दोष मुक्तता
14
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
15
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
16
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
17
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
18
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
19
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
20
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
Daily Top 2Weekly Top 5

एलपीजी-प्राेपॅन मिक्सींग प्रकरणी रायगड पाेलिसांचा छापा नऊ टॅंकरमधील 162 टन साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 23:17 IST

खालापूर तालुक्यातील पाैद येथील गॅस सिलेंडर रिफील करणाऱ्या काॅन्फीडंस इंडिया पेट्राेलीयम लि.  कंपनीमध्ये एलपीजी आणि प्राेपेन गॅसची भेसळ हाेत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली.

आविष्कार देसाई

रायगड - खालापूर तालुक्यातील पाैद येथे एलपीजी आणि प्राॅपेनची भेसळ केल्याप्रकरणी रायगड पाेलिसांनी माेठी कारवाई केली आहे. पाेलिसांनी केलेल्या छाप्यामध्ये  नऊ   टॅंकरमधील सुमारे 162 टन साठा जप्त केला असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी लाेकमतशी बाेलताना दिली. पाेलिसांनी याप्रकरणी आठ जणांना ताब्यात घेतले आहे. 

खालापूर तालुक्यातील पाैद येथील गॅस सिलेंडर रिफील करणाऱ्या काॅन्फीडंस इंडिया पेट्राेलीयम लि.  कंपनीमध्ये एलपीजी आणि प्राेपेन गॅसची भेसळ हाेत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली.याच कंपनीच्या बाजूला असणाऱ्या जागेमध्ये भेसळ सुरु असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यानुसार खालापूर पाेलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यामध्ये 9 टॅंकर सापडले. पैकी दाेन टॅंकर हे प्राॅपेन गॅसचे तर उवर्रीत सात हे एलपीजी गॅसचे आहेत. त्यामध्ये सुमारे एकूण 162 टन साठा सापडला आहे. पाेलिसांनी टॅंकर सील केले आहेत. तसेच या ठिकाणी पाेलिस बंदाेबस्त ठेवला आहे. पाेलिसांनी कारवाईला सुरुवात केल्याने तेथील कामगारांची एकच धावपळ सुरु झाली. त्यातील काही कामगांरानी व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही केल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

सदरचे काही टॅंकर हे गुजरात जामनगर येथून आले असल्याकडेही सुत्रांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे यामागे माेठे रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, काॅन्फीडंस इंडिया पेट्राेलीयम लि.कंपनीमध्ये पाहणी करण्यासाठी गेलाे हाेताे. तांत्रीक तज्ञांचा अहवाल मागवला आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. अद्याप काेणालीही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती खालापूरचे उपविभागीय पाेलिस अधिकारी संजय शुक्ला यांनी लाेकमतशी बाेलताना सांगितले.

याबाबत कंपनीने केलेला खुलासा 

कंपनीकड़े एलपीजी,  प्रोपेन हाताळणे, साठा करणे ह्यासाठी आवश्यक सर्व शासकीय परवानग्या आहेत. तसेच शासकीय आदेशानुसार, सर्व बाबींची पुर्तता करून एलपीजी व्यवसायाची सर्व कामे पार पडली जात असून प्लांटचे परवाने (लायसन्स) २०२३ पर्यंत बहाल केले आहेत. काही व्यावसायिक शत्रु यांच्या चुकीच्या तक्रारीमुळे हा नाहक बदनामी केली जात आहे.

टॅग्स :Policeपोलिस