धक्कादायक! मुंबई ते माथेरान प्रवास; लॉजमध्ये पत्नीचा गळा चिरला अन् शिर दरीत फेकले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 10:18 PM2021-12-13T22:18:21+5:302021-12-13T22:18:40+5:30

माथेरानमध्ये महिलेची गळा चिरून हत्या करणाऱ्याला रायगड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Raigad police have arrested a man accused of slitting the throat of a woman in Matheran | धक्कादायक! मुंबई ते माथेरान प्रवास; लॉजमध्ये पत्नीचा गळा चिरला अन् शिर दरीत फेकले

धक्कादायक! मुंबई ते माथेरान प्रवास; लॉजमध्ये पत्नीचा गळा चिरला अन् शिर दरीत फेकले

googlenewsNext

रायगड : माथेरान मधील इंदिरा नगर परिसरामध्ये एका महिला पर्यटकांची गळा चिरून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. रायगडपोलिसांनी 12 तासात आरोपीचा छडा लावला आहे. रामसिलोचन रामशिरोमणी पाल (३०, गोरेगाव,मुंबई) याला  अटक केली आहे.

घटनास्थळा शेजारी असणाऱ्या दरीमध्ये मृत महिलेची पर्स सापडली, त्यामध्ये गोरेगाव, मुंबई येथील पत्ता असलेली पिशवी सापडली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून रामसिलोचन याला ताब्यात घेतले, रामसिलोचन हा मृत पूनमचा पती आहे. पोलीस खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. महिलेच्या शिराचा शोध दरीत घेतला असता ते तेथे सापडले. ते पुढील तपासासाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

माथेरानमधील इंदिरा नगर परिसरामध्ये अनेक लॉजिंग व्यवसाय करीत असतात अशाच एका लॉजमध्ये एक जोडपे राहण्यासाठी आले होते. नेहमी प्रमाणे लॉजिंग मालकाने त्यांची नावे रजिस्टर मध्ये लिहून त्यांना खोली भाड्याने दिली होती व सकाळी जेव्हा ह्या पर्यटकांना पाहण्यासाठी गेले असता महिलेचे धड कॉट खाली निर्वस्त्र अवस्थेत आढळून आले होते. तसेच त्याचे शीर गायब होते.

सदर महिलेस अतिशय निर्घृणपणे मारण्यात आले असून खुन्याने कोणताही पुरावा मागे राहणार नाही. ह्याची पुरेपर खबरदारी घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे असून धडापासून शीर वेगळे करून सदर धड निर्वस्त्र अवस्थेत खुनी तिथेच सोडून गेला आहे. तर महिलेचे शीर व कपडे सोबत घेऊन जाताना सदर खोलीतील रक्त ही पुसले असल्याचे दिसून येत होते ही घटना समोर आल्यानंतर दोघांचेही ओळखपत्र तपासले असता रूम घेताना दिलेली माहिती खोटी असल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले होते.

Web Title: Raigad police have arrested a man accused of slitting the throat of a woman in Matheran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.