शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
3
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
4
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
5
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
6
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
7
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
8
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
9
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
10
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
11
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
12
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
13
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
15
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
16
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
17
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
19
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
20
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम

बनावट कॉल सेंटरवर छापा; बजाज फायनान्स नावाने मिळवून देत होते कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 20:01 IST

Raids on fake call centers : दोघांना अटक; कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

ठळक मुद्देकल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली असून दिनेश मनोहर चिंचकर आणि रोहीत पांडुरंग शेरकर अशी अटक आरोपींची नावे आहेत.18 ते 20 कर्मचारी नोकरीस ठेवून  हे दोघे उत्तर प्रदेश राज्यातील काही सहका-यांच्या मदतीने बनावट कॉल सेंटर चालवीत असल्याचे चौकशीत समोर आले.

डोंबिवली - सध्या ऑनलाईन माध्यमातून आर्थिक फसवणुकीचे प्रमाण वाढले असताना बजाज फायनान्स कंपनीच्या नावाने कर्ज देण्याच्या बहाण्याने आगाऊ पैसे भरण्यास लावून फसवणूक करणा-या दोघांना डोंबिवलीतील बनावट कॉल सेंटरवर धाड टाकून अटक करण्यात आली आहे. कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली असून दिनेश मनोहर चिंचकर आणि रोहीत पांडुरंग शेरकर अशी अटक आरोपींची नावे आहेत.

नांदेड जिल्ह्यातील सायबर सेलच्या महिला पोलीस उप निरीक्षक अनिता चव्हाण यांच्याकडे फसवणूक झालेल्या काही जणांनी तक्रारी केल्या होत्या. संबंधितांना ज्या मोबाईल क्र मांकावरून कॉल आले त्याचा तपास करता लॉकडाऊन कालावधीत कॉल सेंटरचे कामकाज एकाच ठिकाणी चालू न ठेवता वेगवेगळया ठिकाणी  चालू असल्याचे समोर आले. दरम्यान नांदेड येथून उपलब्ध झालेल्या माहीतीनुसार कल्याण गुन्हे अन्वेषण विभागानेही मोबाईल लोकेशन वरून शहरातील बहुतांश कमर्शिअल कॉम्प्लेक्स असलेल्या ठिकाणी 15 ते 20 दिवस पाळत ठेऊन बनावट कॉल सेंटरचा थांगपत्ता शोधून काढला. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेंढरकर महाविद्यालयाच्या नजीक असलेल्या सिटी मॉल मध्ये हे कॉल सेंटर असल्याचे आढळून आले. नांदेड येथील इतवारा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारीनुसार संबंधित बनावट कॉल सेंटरवर इतवारा आणि कल्याण गुन्हे शाखेने संयुक्तपणे कारवाई केली. यात चिंचकर आणि शेरकर यांना अटक करण्यात आली.

18 ते 20 कर्मचारी नोकरीस ठेवून  हे दोघे उत्तर प्रदेश राज्यातील काही सहका-यांच्या मदतीने बनावट कॉल सेंटर चालवीत असल्याचे चौकशीत समोर आले. त्यांनी मोबाईल क्रमांकाचा ऑनलाईन डाटाबेस मिळवून नोकरीवर ठेवलेल्या कर्मचा-यांना प्राप्त मोबाईल क्रमांकाच्या डाटाबेस मधील  क्रमांकावर फोन करण्यास लावून बजाज फायनान्स कंपनीमार्फत लोन मिळवून देतो असे सांगून लोकांना कर्ज पास करणो करिता आगाऊ रक्कम भरण्यात लावून फसवणूक केली आहे. या ठिकाणाहून 26 मोबाईल, एक लॅपटॉप, अनधिकृतरित्या मिळवलेला मोबाईल क्र मांकाचा डाटाबेस, इतर कागदपत्र असा एकूण 1लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . या ठिकाणी नोकरी करणा-या कर्मचा-यांची चौकशी सुरू असल्याची माहीती पोलीसांनी दिली.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसdombivaliडोंबिवलीUttar Pradeshउत्तर प्रदेशjobनोकरीraidधाडonlineऑनलाइन