बनावट परफ्युमच्या कारखान्यावर छापा, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 16:25 IST2021-01-30T16:22:37+5:302021-01-30T16:25:02+5:30

Nagpur police : याप्रकरणी आरोपी संजयकुमार शर्मा याला पोलासांनी अटक केली आहे.

Raid on fake perfume factory, big action by Nagpur police | बनावट परफ्युमच्या कारखान्यावर छापा, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

बनावट परफ्युमच्या कारखान्यावर छापा, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

ठळक मुद्देखामला परिसरातील संजयकुमार शर्मा हा आरोप गेल्या वर्षभरापासून ब्रँडेड कंपनीचे नकली परफ्यूम आणि बॅाडी स्प्रे तयार करत होता.

नागपूर : तुम्ही एखाद्या ब्रँडेड कंपनीचे परफ्युम आणि बॅाडी स्प्रे वापरत असाल तर सावध व्हा...कारण, तुम्ही वापरत असलेला परफ्यूम आणि बॅाडी स्प्रे नकली आणि घातक केमिकल असलेला सुद्धा असू शकतो. 

नागपूर पोलिसांनी अशाच नकली परफ्यूम आणि बॅाडी स्प्रेच्या एका कारखान्यावर छापा टाकली आहे. खामला परिसरातील संजयकुमार शर्मा हा आरोप गेल्या वर्षभरापासून ब्रँडेड कंपनीचे नकली परफ्यूम आणि बॅाडी स्प्रे तयार करत होता. वर्षभरात कोट्यवधी रुपयांच्या नकली परफ्यूम आणि बॅाडी स्प्रेची त्यांनी विक्री केली आहे.

प्रतापनगर पोलिसांनी या कारखान्यावर छापा टाकला आणि पाच लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आरोपी संजयकुमार शर्मा याला पोलासांनी अटक केली आहे.

Web Title: Raid on fake perfume factory, big action by Nagpur police