छोट्या भावाच्या डोक्यावर बंदूक ठेवली; अल्पवयीन मुलीवर चार शेजाऱ्यांकडून बलात्कार, Video व्हायरल करण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 16:07 IST2021-07-25T16:04:25+5:302021-07-25T16:07:48+5:30
Crime news Gang Rape: तक्रार मिळाल्यावर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच तपास सुरु केला आहे.

छोट्या भावाच्या डोक्यावर बंदूक ठेवली; अल्पवयीन मुलीवर चार शेजाऱ्यांकडून बलात्कार, Video व्हायरल करण्याची धमकी
देशातील गुन्हेगारीची राजधानी बनलेल्या उत्तर प्रदेशमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. मुझफ्फरनगरमध्ये छोट्या भावावर बंदुक रोखत अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची घटना घडली आहे. चार आरोपींनी यावेळी बलात्कार करतानाचा व्हिडीओ देखील काढला आणि तो दाखवत पीडितेने याची वाच्यता केल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती. (Gang rape on 15 years old girl from 4 neighbor youth. )
तक्रार मिळाल्यावर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच तपास सुरु केला आहे. हा धक्कादायक प्रकार फुगाना पोलीस ठाणे क्षेत्रातील आहे. जिथे शुक्रवारी रात्री उशिरा एका 12 वर्षीय मुलाला शेजारच्या चार तरुणांनी बंदुक दाखवत बंधक बनवले. यानंतर त्याच्या डोक्यावर बंदूक धरत त्याच्या 15 वर्षीय बहिणीवर चारजणांनी बलात्कार केला.
पीडितेचे आई-वडील एका नातेवाईकाकडे कार्यक्रमानिमित्त गेले होते. तेव्हा घरात भाऊ-बहीण दोघेच असल्याचे पाहुन शेजारच्या तरुणांनी डाव साधला. आई-वडील घरी परतल्यानंतर पीडीतेने त्यांना घडलेला सारा प्रकार सांगितला. पीडितेच्या पालकांनी पोलीस ठाणे गाठून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी तातडीने पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये पाठविले असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.