"एक-दोन नाही, हजारो कपल्सच्या रोमान्सचे व्हिडीओ रेकॉर्ड"; आरोपीचा खळबळजनक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 14:16 IST2025-12-11T14:15:16+5:302025-12-11T14:16:10+5:30
उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर येथे पूर्वांचल एक्स्प्रेस-वेवर कारमध्ये एका कपलच्या रोमान्सचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होण्याच्या प्रकरणामुळे सध्या खळबळ उडाली आहे.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर येथे पूर्वांचल एक्स्प्रेस-वेवर कारमध्ये एका कपलच्या रोमान्सचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होण्याच्या प्रकरणामुळे सध्या खळबळ उडाली आहे. या प्रकरणात 'अँटी ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' (ATMS) चा मॅनेजर आशुतोष सरकारला काढून टाकण्यात आलं आहे. याच दरम्यान, आरोपीने धक्कादायक माहिती दिली. पोलिसांना चौकशीदरम्यान त्याने जे सांगितलं ते समजल्यावर सर्वच जण हादरले.
आशुतोषने सांगितलं की, ही काही पहिली घटना नव्हती, केवळ एका कपलचा व्हिडीओ बनवण्यात आला नाही, तर आतापर्यंत हजारो कपल्सचे प्रायव्हेट व्हिडीओ बनवले आहेत. गेल्या अडीच वर्षांत अशा हजारो घटना समोर आल्या, परंतु त्याने एकही व्हिडीओ व्हायरल केला नाही. जो व्हिडीओ व्हायरल झाला, तो टोल नाक्यावर काम करणाऱ्या एका माजी कर्मचाऱ्याने एका ड्रायव्हरला दिला होता, ज्यामुळे हा प्रायव्हेट व्हिडीओ लीक झाला.
'अँटी ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' (ATMS) चे काम पाहणाऱ्या वेंडर कंपनीने आशुतोष सरकारसह सिस्टीम टेक्निशियन आशुतोष तिवारी, ट्रॅफिक मॅनेजर शशांक शेखर आणि सिस्टीम इंजिनिअर प्रमोद कुमार यांनाही नोकरीवरून काढून टाकलं आहे. या चौघांविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्रही देण्यात आलं होतं. त्याची दखल घेऊन पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यापैकी तिघांना अटक केली. उर्वरित एक आरोपी शशांक शेखर याचा पोलीस शोध घेत आहेत.
२५ ऑक्टोबर रोजी आझमगढहून लखनौला जाणाऱ्या एका कपलचा पूर्वांचल एक्सप्रेस-वेवर कारमध्ये रोमान्स करतानाचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं होतं. २ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सुलतानपूरचे जिल्हाधिकारी (डीएम) आणि पोलीस अधीक्षक (एसपी) यांच्याकडे याबद्दल लेखी तक्रार करण्यात आली.
तक्रारीत असं नमूद केलं होतं की, आशुतोष सरकारने एक्सप्रेस-वेवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून या नवविवाहित कपलचा व्हिडीओ बनवला आणि त्यांच्याकडून ३२ हजार रुपये वसूल केले. तक्रारीत अशाच आणखी तीन घटनांचा उल्लेख करण्यात आला होता. यानंतर, ATMS चे काम पाहणाऱ्या वेंडर कंपनी सुपर वेव कम्युनिकेशन अँड इन्फ्रा सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड (SCIPL) ने आशुतोष सरकारला कामावरून काढून टाकलं. ९ डिसेंबर रोजी पोलिसांनी या प्रकरणात आशुतोषला अटक केली.