Laljit Singh Bhullar : गगनदीप सिंग रंधावा आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई; माजी मंत्री लालजीत सिंग भुल्लर यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 17:01 IST2026-03-23T17:01:07+5:302026-03-23T17:01:36+5:30

Laljit Singh Bhullar : पंजाबमधील गगनदीप सिंग रंधावा प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी आणि माजी मंत्री लालजीत सिंग भुल्लर यांना पोलिसांनी अटक केली आहे.

punjab gagandeep singh randhawa case Laljit Singh Bhullar arrested | Laljit Singh Bhullar : गगनदीप सिंग रंधावा आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई; माजी मंत्री लालजीत सिंग भुल्लर यांना अटक

Laljit Singh Bhullar : गगनदीप सिंग रंधावा आत्महत्या प्रकरणात मोठी कारवाई; माजी मंत्री लालजीत सिंग भुल्लर यांना अटक

पंजाबमधील गगनदीप सिंग रंधावा आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी आणि माजी मंत्री लालजीत सिंग भुल्लर यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना फतेहगड साहिब जिल्ह्यातील मंडी गोविंदगड येथून अटक केली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना अमृतसर न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली जाईल.

एफआयआर (FIR), सुसाईड व्हिडीओ आणि कुटुंबीयांनी केलेले गंभीर आरोप यामुळे हे प्रकरण अत्यंत संवेदनशील बनलं आहे. हे प्रकरण आता संसदेपर्यंत पोहोचले असून याची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. याच दरम्यान भगवंत मान सरकारने स्पष्ट केलं आहे की, या प्रकरणात कोणताही पक्षपात केला जाणार नाही आणि कायदा आपलं काम करेल.

गगनदीप सिंग रंधावा हे अमृतसरमध्ये 'पंजाब स्टेट वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन' (PSWC) येथे जिल्हा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येनंतर पत्नी उपिंदर कौर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे रणजित एव्हेन्यू पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीत माजी मंत्री लालजीत भुल्लर, त्यांचे वडील सुखदेव सिंग आणि काही लोकांवर सतत छळ करणं, मानसिक दबाव टाकणं आणि धमकावणं असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

"मंत्र्यांनी माझ्या पतीला खूप टॉर्चर केलं", आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याच्या पत्नीचे गंभीर आरोप

२१ मार्च २०२६ रोजी सकाळी गगनदीप रंधावा यांनी 'सल्फास' हे विषारी द्रव्य घेतलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांनी १२ सेकंदाचा एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता, जो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूसाठी थेट लालजीत भुल्लर यांना जबाबदार धरलं आहे.

गगनदीप सिंह रंधावा यांनी म्हटलं होतं की, "मंत्र्यांच्या भीतीमुळे मी आत्महत्या करत आहे." सुरुवातीला कारवाईच्या मागणीसाठी कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला होता. त्यानंतर रात्री पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी 'भारतीय न्याय संहिता' (BNS) च्या विविध कलमान्वये आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणं, गुन्हेगारी धमकी आणि विश्वासघात यांसारख्या आरोपांखाली गुन्हा नोंदवला आहे.

Web Title : गगनदीप सिंह रंधावा आत्महत्या मामले में पूर्व मंत्री गिरफ्तार

Web Summary : गगनदीप सिंह रंधावा आत्महत्या मामले में पूर्व मंत्री लालजीत भुल्लर गिरफ्तार। रंधावा, एक PSWC प्रबंधक ने कथित तौर पर एक वीडियो में भुल्लर को दोषी ठहराते हुए आत्महत्या कर ली। परिवार के आरोपों और एक प्राथमिकी के कारण गिरफ्तारी हुई। मामले की सीबीआई जांच की मांग संसद तक पहुंची।

Web Title : Ex-Minister Arrested in Gagandeep Singh Randhawa Suicide Case

Web Summary : Former Minister Laljit Bhullar arrested in connection with the Gagandeep Singh Randhawa suicide case. Randhawa, a PSWC manager, allegedly died by suicide, blaming Bhullar in a video. Family accusations and an FIR led to the arrest. The case has reached parliament, demanding a CBI inquiry.