चोपड्यानजीक गोळीबार पुण्याचा युवक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 23:57 IST2021-07-16T23:55:47+5:302021-07-16T23:57:18+5:30
Crime News: उमर्टी येथून गावठी पिस्तूल घेऊन जाणाऱ्या पुणे येथील दोन तरुणांवर दुसऱ्या गटातील तीन जणांनी हल्ला केला.

चोपड्यानजीक गोळीबार पुण्याचा युवक जखमी
जळगाव : उमर्टी येथून गावठी पिस्तूल घेऊन जाणाऱ्या पुणे येथील दोन तरुणांवर दुसऱ्या गटातील तीन जणांनी हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत गावठी कट्टयातून गोळीबार झाला. यात विक्की घोलप (चिंचवड, पुणे) हा जखमी झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता उमर्टी गावाजवळ घडली. घोलप यास उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.