पुणे साखळी बॉम्बस्फोट: आरोपीची दुसऱ्यांदा सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 07:17 AM2023-01-20T07:17:28+5:302023-01-20T07:18:22+5:30

मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Pune serial blasts: Accused freed for second time | पुणे साखळी बॉम्बस्फोट: आरोपीची दुसऱ्यांदा सुटका

पुणे साखळी बॉम्बस्फोट: आरोपीची दुसऱ्यांदा सुटका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पुणे साखळी बॉम्बस्फोटातील आरोपीने कच्चा कैदी म्हणून सहा वर्षे कारागृहात काढली. त्यामुळे खटल्याआधीच आणखी काही वर्षे कारागृहात काढणे आवश्यक नाही, असे मत नोंदवीत उच्च न्यायालयाने आरोपी अस्लम शब्बीर शेख ऊर्फ बंटी जागीरदार याची दुसऱ्यांदा जामिनावर सुटका केली.

पुणे शहरात १ डिसेंबर २०१२ रोजी संध्याकाळी सात वाजता पाच बॉम्बस्फोट झाले. डेक्कन जिमखाना, बालगंधर्व रंगमंदिर व अन्य ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. एका ठिकाणी पोलिसांना जिवंत बॉम्ब सापडला. सुरुवातीला डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्यात अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तपास एटीएसकडे वर्ग केला. याप्रकरणी नऊजणांना अटक करण्यात आली, तर काही अद्याप फरार आहेत. 

सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी सामान्यांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी बॉम्बस्फोट केले. या बॉम्बस्फोटांत लोकांचा जीव गेला. काही लोक जखमी झाले आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. दहशतवादी संघटना इंडिया मुजाहिद्दीनचा सदस्य कातील सिद्दीकी याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पुण्यात बॉम्बस्फोट केले. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर बॉम्बस्फोटाने उडविण्याचा कट रचल्याबद्दल सिद्दीकीला अटक केली होती. येरवडा कारागृहात दोघांनी त्याची हत्या केली.

२०१५ मध्ये शेखला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.  त्याने दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरविली होती आणि स्फोटावेळी ती शस्त्रे वापरली नाहीत. १ ऑक्टोबर २०१५ मध्ये त्याचा जामीन मंजूर केला. शेखने  अटींचे उल्लंघन केल्याची तक्रार एटीएसने केल्यावर २०१९ मध्ये पुन्हा कारागृहात पाठविले. २०२० मध्ये त्याने पुन्हा जामीनासाठी अर्ज केला. ‘२०१२ मधील बॉम्बस्फोटाचा खटला सुरू झालेला नाही,’ असे म्हणत न्यायालयाने २०१५ मध्ये शेखला जामिनावर सोडताना न्यायालयाने ज्या अटी घातल्या होत्या, त्याच अटींवर न्यायालयाने जामिनावर सुटका केली.

Web Title: Pune serial blasts: Accused freed for second time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.