तरुणीवर चार वर्ष बलात्कार करणारा जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 22:09 IST2018-09-13T22:06:27+5:302018-09-13T22:09:04+5:30

लग्न करण्याचे आमिष दाखवत तरुणीला शहराच्या विविध भागात नेवून तिच्यावर चार वर्षाहून अधिक काळ बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

Pune police arrested rapist who raped the girl for four years | तरुणीवर चार वर्ष बलात्कार करणारा जेरबंद 

तरुणीवर चार वर्ष बलात्कार करणारा जेरबंद 

पुणे : लग्न करण्याचे आमिष दाखवत तरुणीला शहराच्या विविध भागात नेवून तिच्यावर चार वर्षाहून अधिक काळ बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात कोथरूड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. 

            हेमंत विश्वास कंधारे (वय ३७, रा. कलासागर सोसायटी, चांदणी चौक, कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही घटना सन २०१४ ते ११ सटेंबर २०१८ या कालावधीत कर्वे रस्ता, दांडेकर पूल परिसर, शिवणे आणि भूगाव येथे घडली. याबाबत २५ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली आहे. कंधारे याने तुज्याशीच लग्न करणार आहे असे फिर्यादीला म्हणत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. त्यानंतर फिर्यादीने लग्नाबाबत विचारणा केली असता मी तुज्याशी लग्न करणार नाही, तुला काय करायचे ते कर असे म्हणत त्याने तिला शिवीगाळ केली. त्यामुळे तिने याबाबत पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार त्याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी सक्षमतेची आणि वैद्यकीय तपासणी करण्यासाठी, कृत्यासाठी कोणी मदत केली आहे का, याचा शोध घेण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील हेमंत मेंडकी यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

Web Title: Pune police arrested rapist who raped the girl for four years