आपल्या प्रियकरासोबत आईने लावून दिलं अल्पवयीन मुलीचं लग्न, अनेक दिवस अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 11:14 AM2022-11-12T11:14:30+5:302022-11-12T11:14:58+5:30

Crime News : 35 वर्षीय महिला तिच्या 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत पुण्याच्या चंदननगर भागात राहते. तिचं अनेक महिन्यांपासून एका 28 वर्षीय तरूणासोबत अफेअर सुरू होतं. 

Pune : Mother lover raped minor girl in Chandan Nagar | आपल्या प्रियकरासोबत आईने लावून दिलं अल्पवयीन मुलीचं लग्न, अनेक दिवस अत्याचार

आपल्या प्रियकरासोबत आईने लावून दिलं अल्पवयीन मुलीचं लग्न, अनेक दिवस अत्याचार

Next

Crime News : पुणे (Pune Crime News) शहरात एका आईने तिच्या अल्पवयीन मुलीचं लग्न आपल्याच प्रियकरासोबत लावून दिलं. धक्कादायक बाब म्हणजे लग्नानंतर महिलेच्या प्रियकराने अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंधही ठेवले. 15 वर्षीय अल्पवयीनने तिच्यासोबत घडलेला हा प्रकार आपल्या मैत्रिणीजवळ सांगितला. मैत्रिणीने हे एका दुसऱ्या महिलेला सांगितलं. मग त्या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर आरोपी आई आणि तिच्या  प्रियकराला बाल विवाहासहीत रेपच्या केसमध्ये अटक करण्यात आली.

35 वर्षीय महिला तिच्या 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत पुण्याच्या चंदननगर भागात राहते. तिचं अनेक महिन्यांपासून एका 28 वर्षीय तरूणासोबत अफेअर सुरू होतं.  या तरूणाचं महिलेच्या घरी  नेहमीच येणं-जाणं होतं. मग एक दिवस अल्पवयीन मुलीने दोघांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. महिलेला वाटलं की, मुलगी आता हे सगळ्यांना सांगेल. तर तिने मुलीला मारण्याची धमकी देत आपल्या प्रियकरासोबत लग्न करण्याचा दबाव टाकला. मुलीने नकार देऊनही काही दिवसांआधीच दोघांचं लग्न लावून देण्यात आलं.

यानंतर आरोपी तरूणाने अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. काही दिवस हेच सुरू राहिलं. पण आईच्या भितीने तिने कुणालाच काही सांगितलं नाही. ती रोज अत्याचार सहन करत राहिली. 

मग एक दिवस पीडितेने तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार आपल्या मैत्रीणीला सांगितला. जे ऐकून तिला धक्का बसला. तिने हे सगळं तिच्या ओळखीच्या एका महिलेला सांगितलं. त्या महिलेने याबाबत पोलिसांना सूचना दिली.

पोलिसांनी लगेच चौकशी सुरू केली. चौकशीतून समोर आलं की, बाल विवाह झाला आहे. नंतर पोलिसांनी लगेच अल्पवयीन मुलीचं रेस्क्यू केलं आणि आरोपींना अटक केली. मुलीची आई आणि तरूणावर बाल-विवाहासोबत रेपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरोपी महिलेने सांगितलं की, ती तिच्यासोबत मुलीसोबत तिच्या गावात एका कार्यक्रमासाठी गेली होती. तिथेच तिची या आरोपी तरूणासोबत ओळख झाली होती. त्यानंतर त्यांचं अफेअर सुरू झालं होतं.

Web Title: Pune : Mother lover raped minor girl in Chandan Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.