जेवणास उशीर होईल असे सांगितल्याने पत्नीचा पाडला दात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 14:58 IST2020-11-08T14:57:40+5:302020-11-08T14:58:57+5:30

Crime news : जेवण बनविण्यास उशीर होईल, असे सांगितल्याने पतीने रागाच्या भरात पत्नीच्या तोंडावर ठोसा मारुन दातच पाडला.

Pune Crime news | जेवणास उशीर होईल असे सांगितल्याने पत्नीचा पाडला दात

जेवणास उशीर होईल असे सांगितल्याने पत्नीचा पाडला दात

पुणे - जेवण बनविण्यास उशीर होईल, असे सांगितल्याने पतीने रागाच्या भरात पत्नीच्या तोंडावर ठोसा मारुन दातच पाडला. याप्रकरणी चतु:श्रृंगी
पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना औंध गावातील रानवडे पाटील निवास येथे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता घडली. याप्रकरणी ४० वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार चतु:श्रृंगी पोलिसांनी तिचा पती प्रभाकरन (वय ४५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, कविता आणि प्रभाकरन हे पती पत्नी आहेत.

प्रभाकरन हा शुक्रवारी सायंकाळी दारु पिऊन घरी आला. त्याने पत्नीला : जेवण बनविण्यास सांगितले. कविता या दुसरे काम करत असल्याने त्यांनी जेवण
बनविण्यास दीड तास लागेल, असे सांगितले. त्यावर राग येऊन प्रभाकरन याने पत्नीला शिवीगाळ करुन तिच्या तोंडावर ठोसा मारला. हा ठोसा इतका जोरात होता की त्यात कविता यांचा दात पडला. पोलीस हवालदार काटम अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Pune Crime news